आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवार साहेबांची पाठ फिरताच राजेश टोपे-पाटलांत वाक्युद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्याच्यादुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेले माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार माघारी फिरताच माजी मंत्री राजेश टोपे रंगाबाद राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील यांच्यात खडाजंगी झाली. एका गंभीर विषयावर टोपेंशी चर्चा केल्याचे पाटील सांगत आहेत, तर दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या कुटुंबाकडे लक्ष दिले जात नसल्याची विनोद पाटील यांची तक्रार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

परभणी जालना दौरा आटोपल्यानंतर पवार दुपारी साडेचार वाजता चिकलठाणा विमानतळावरून मुंबईला रवाना झाले. त्यांच्यासमवेत आ. धनंजय मुंडे, आ. अमरसिंह पंडित, आ. सतीश चव्हाण, माजी मंत्री राजेश टोपे होते. शरद पवार यांचे विमान उडताच राजेश टोपे विनोद पाटील यांच्यात जोरदार वाक््युद्ध झाले. एका गंभीर विषयावर चर्चा दोघांमध्ये सुरू झाली.

टोपेंसमवेत गंभीर विषयावर चर्चा
-राजेशटोपे आमचे वरिष्ठ नेते असून त्यांच्यासमवेत गंभीर विषयावर चर्चा केली. कार्यकर्ता म्हणून आपणास राजेश टोपे यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. त्यामुळे यापुढेही त्यांना प्रश्न विचारू. विनोदपाटील, राष्ट्रवादीपदाधिकारी.

आबांच्या कुटुंबाकडे सर्वांचेच लक्ष
- आर.आर. पाटील यांच्या कुटुंबाकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी विनोद पाटील यांची मागणी आहे. आबांच्या कुटुंबाकडे शरद पवार, अजित पवार सुप्रिया सुळे जातीने लक्ष देत आहेत. राजेशटोपे, माजीमंत्री

टोपेंवर नाराजीचे कारण काय?
राज्यातआघाडीची सत्ता असताना टोपेंवर औरंगाबाद संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी होती. मात्र कोणत्याच निवडणुकीकडे टोपेंनी लक्ष दिले नसल्याने राष्ट्रवादीची मोठी हानी झाल्याची भावना पदाधिकाऱ्यांची आहे. स्वत:च्या जालना जिल्ह्यातील भोकरदन बदनापूर येथेही त्यांनी लक्ष दिले नाही, असे राष्ट्रवादीतील पदाधिकारी सांगत आहेत.