आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलपँटमुळे यंदा संचलनात वाढणार संघाचे स्वयंसेवक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यंदा विजयादशमीच्या (११ ऑक्टोबर) संचलनात प्रथमच खाकी हाफऐवजी फुलपँट परिधान करणार आहेत. ११ जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या संघाच्या देवगिरी प्रांतासाठी १८ हजार फुलपँट मागवण्यात आल्या. त्यापैकी औरंगाबादेत १५०० हून अधिक विकल्या गेल्या आहेत. गेल्या वर्षी ९०० जण संचलनात सहभागी झाले होते. फुलपँटमुळे यंदा ही संख्या १५०० वर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मार्चमध्ये नागौर येथे झालेल्या संघाच्या राष्ट्रीय प्रतिनिधीच्या मेळाव्यात गणवेश बदलाचा निर्णय घेण्यात आला होता. संघाच्या देवगिरी प्रांताचे मुख्यालय असणाऱ्या औरंगाबादच्या प्रल्हादजी अभ्यंकर भवनमध्ये महिनाभरापासून नवीन गणवेशाची तयारी करण्यात आली होती. औरंगाबादेतून गणवेश काही जिल्हा आणि तेथून तालुका मुख्यालयात पाठवण्यात आले. हजार गणवेश भविष्यातील कार्यक्रमांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. औरंगाबादेत १५०० हून अधिक गणवेश विकल्याची माहिती गणवेश विभागप्रमुख जगदीश दाबके यांनी दिली. फुलपँट आणि मोजांचा सेट ३३० रुपयांचा आहे. बूट ४००, टोपी २०, तर पट्टा ६० रुपयांचा आहे. सोमवारी आमदार अतुल सावे, नगरसेवक अनिल मकरिये आणि माजी नगरसेवक भाऊसाहेब ताठे यांनी प्रल्हादजी भवनात रांंगेत उभे राहून गणवेश खरेदी केली. सावे म्हणाले की, संघाच्या शिस्त आणि विचारांमुळे लोक संचलनात सहभागी होतात. केवळ फुलपँटमुळे यंदा संख्या वाढली, असे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही. गणवेश बदलाचा परिणाम म्हणून तरुणाई मोठ्या प्रमाणात संघाकडे आकर्षित झाल्याचे दिसते. गेल्या वर्षी संचलनात ९०० स्वयंसेवक हाेते. यंदा १५०० पेक्षा अधिक गणवेशांची विक्री झाल्याने किमान १५०० जण संचलनात असतील, असा दावा संघाचे देवगिरी प्रांत प्रचारप्रमुख वामनराव देशपांडे यांनी केला.

चार ठिकाणांहून संचलन : संचलनासाठीशहराच्या भागांची २५ नगरांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक विभागात १९० वसाहतींचा समावेश आहे. वाळूज भागात ऑक्टोबरलाच संचलन झाले. उर्वरित चार भागात मंगळवारी सकाळी सात वाजता संचलन होईल. घोषांसह ५० मिनिटे ते एक तास चालेल. गुजराती कन्या विद्यालय आणि एन-१२ च्या मनपा शाळेजवळून प्रत्येकी एका भागाचे, तर टिळकनगरच्या जयभवानी शाळेजवळून भागांचे संचलन होईल. यात विभागप्रमुख, नगर कार्यवाह, नगर संघचालक सहभागी होतील, असे देशपांडे यांनी सांगितले.
नवीन गणवेशाची पाहणी करताना आमदार अतुल सावे.

९० वर्षांच्या परंपरेत बदल, १५ हजार गणवेश विक्री
^संघाच्या नियमित शाखेत सहभागी होण्यासाठी फुलपँट बंधनकारक नाही. गणवेशातील कार्यक्रमांसाठीच फुलपँट आवश्यक आहे. देवगिरी प्रांतात १५ हजार गणवेश विकले गेले असले तरी प्रत्यक्षात स्वयंसेवकांची संख्या कितीतरी पटीने वाढली आहे. -वामनराव देशपांडे, देवगिरी
प्रांतप्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
डॉ. केशवराव हेडगेवार यांनी १९२५ मध्ये नागपुरात विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. स्थापनादिनी १९२६ पासून पथ संचलनाची सुरुवात झाली. १९३० मध्ये सर्वप्रथम सघोष संचलन काढण्यात आले. १९४० मध्ये इंग्रजांनी संघाच्या गणवेश, पथसंचलनावर बंदी घातली होती.
बातम्या आणखी आहेत...