आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर मोजणीवरून महापालिका पथकासमोर सासू-सुनेचा वाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील मालमत्तांची नोंदणी करून त्यांना डिजिटल कार्ड देण्यासाठी शासनाने फॅमिली वेलफेअर योजना सुरू केली आहे. सातारा-देवळाईमधून या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. दुसऱ्याच दिवशी येथे मोजणी करून नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली, परंतु घरासमोर जमलेले अधिकारी आणि कागदपत्रांवर स्वाक्षरी करणाऱ्या सूनबाई पाहून ती घर नावावर करून घेतेय या सासूबाईच्या गैरसमजातून गोंधळ उडाला. नव्याने नोंदणी केल्यानंतर यावर पडदा पडला. 
 
मालमत्तांची नोंदणी करून त्यांना कर योग्य बनवण्यासह घराची ओळख असलेले डिजिटल स्मार्ट कार्ड देण्याचे काम सीसीआय (सेंट्रल कमर्शिअल इंडस्ट्री ऑफ इंडिया) या कंपनीला काम देण्यात आले आहे. जून रोजी वर्तमानपत्रात तसे जाहीर प्रगटन दिले असून आयुक्तांच्या परवानगीने कामाला प्रारंभ झाला. सीसीआय कंपनीचे काही प्रशिक्षित कर्मचारी सातारा गावातील मोजणी करत होते. काही ग्रामस्थांनी या कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली असता, त्यांना मोजणीबाबत कोणतीच माहिती देता आली नाही. तसेच त्यांच्याकडून मनपाकडून काम करत असल्याचाही पुरावा देता आला नाही. त्यामुळे पेच निर्माण झाला. 

^मोजणी पूर्णघरांची होत असल्याने या कामात महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश असावा. प्रत्येक वेळी पुरुष मंडळी घरी असतील, असे नाही. तसेच या कर्मचाऱ्यांकडे मनपाचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. पावतीवर कुणाचीही स्वाक्षरी नाही, ती योग्य कशी म्हणावी? -आशा शिराणे, सुनीता नरवडे, गृहिणी सातारा 

कर्मचारी राहिले बाजूजला सासू-सुनेतच जुंपली.... 
गावातील एका घरात सहा महिन्यांपूर्वीच सूनबाई आल्या होत्या. मोजणी सुरू असताना सूनबाई एकट्याच घरी होत्या. मोजणीनंतर नोंदणी घर क्रमांकासह आधार क्रमांक नोंदवण्यात कर्मचारी व्यस्त होते. सासूबाईंनी घरी येताच काय सुरू आहे, याची चौकशी केली. घराची नोंदणी करून टॅक्स लावण्यासाठी घराला नंबर देणार आहे. तसेच त्याचे डिजिट कार्ड मिळणार असून आधार कार्ड असणाऱ्याची त्यात माहिती असणार असल्याचा खुलासा केला. मात्र, कर्मचाऱ्यांची माहिती ऐकून सूनबाई घर नावावर करून घेतेय, असा सासूबाईंचा गैरसमज झाला. यातून नवाच गोंधळ झाला. संतापलेल्या सासूबाईंनी सुनेची कानउघाडणी केली. ‘मी इतकी वर्षे घर सांभाळले अन् तू दोन दिवसांत येऊन घरावर कब्जा करतेस का’, असे म्हणत त्यांनी घर डोक्यावर घेतले. नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत घातली. मात्र, सासूबाई ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर या कर्मचाऱ्यांनी नोंदणी अर्ज फाडून सासूबाईंच्या नावाने दुसरा अर्ज भरला.
त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. 

साताऱ्यातून प्रारंभ 
शहरातीलमालमत्तांची नोंदणी करून त्यांना कर लावण्यासह डिजिटल कार्ड देण्यात येणार आहे. मात्र सातारा-देवळाई भाग नव्याने मनपात समाविष्ट झाल्याने नोंदणीला येथून सुरुवात झाली. सध्या १२ जणांकडून नोंदणी करण्यात येत असून ३०० घरांची माहिती गोळा केली. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे. नोंदणीसाठी ४० रुपये घेण्यात येत आहेत. 

^मालमत्तांची कर आकारणी करण्यासाठी घरांची मोजणी आणि नोंदणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचे काम सीसीआय करत असून त्यासाठी मनपा निधी देत नाही. शासनाने सीसीआय या संस्थेची नियुक्ती केली आहे. -वसंत निकम, मालमत्ता कर आकारणी अधिकारी 
बातम्या आणखी आहेत...