आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे रुळांवर घाटीच्या कर्मचाऱ्याचा मृतदेह, घात की अपघात, पोलिसांचा तपास सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- घाटी रुग्णालयात कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचा मृतदेह सोमवारी सकाळी वाजेच्या सुमारास शरणापूरजवळ रेल्वे रुळांवर आढळला. हा अपघात की आत्महत्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कल्याण यशवंत फासगे (४८, रा. तिसगाव) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 
फासगे यांना दोन मुले आहेत. त्यांचा मुलगा अमर रविवारी कंपनीतून कामावरून येत असताना वडील कपड्याने भरलेली बॅग घेऊन बाहेर जात असल्याचे निदर्शनास आले. अमरने त्यांना गाडीवर बसवून घरी आणले होते. त्यानंतर वडील घरात दिसल्याने त्यांचा रात्री शोधही घेतला; पण ते सापडले नाहीत, असे अमरने पोलिसांना सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...