आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे बरसला तर कुठे फसला कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी गुरुवारी विमानाने दोन फेऱ्या मारल्या. पहिल्या उड्डाणात राहुरी, लातूर, उस्मानाबाद, बीडमध्ये, तर दुसऱ्या उड्डाणात सोलापूर, सांगली, अहमदनगर आणि औरंगाबादमध्ये क्लाऊड सीडिंग करण्यात आले. दरम्यान, अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले सी डॉपलर रडारही गुरुवारी औरंगाबादमध्ये पोहोचले आहे. दिवसभर या रडारच्या जोडणीचे काम सुरू होते.

चिकलठाणा विमानतळावरून सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी विमान आकाशात झेपावले. त्याने राहुरी, लातूर, उस्मानाबाद आणि बीडमध्ये एकूण २४ फ्लेअर्स सोडले. त्यानंतर विमानतळावर परत इंधन भरून सोलापूर, सांगली अहमदनगर आणि औरंगाबादमध्ये क्लाऊड सीडिंग केले.

बीडमध्ये प्रयोग यशस्वी
दोनदिवसांच्या मोहिमेबाबत आपत्ती व्यवस्थापन संचालक सुहास दिवसे यांनी सांगितले की, चार ऑगस्टला शेवगाव आणि नेवासा तालुक्यात, तर तांबा राजुरी, लिंबागणेश, पाडळी आणि माजलगाव, गेवराई परिसरात दीड ते चार वाजेदरम्यान क्लाऊड सीडिंग केले. तेथे यश आले.

अपयश
विरळढगांमुळे लातूर, उस्मानाबादेत अपयश लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याची अवर्षणप्रवणता लक्षात घेता उस्मानाबाद जिल्ह्यात दुरसा, तेर, किन्ही, जेजसा, भूम, परांडा या परिसरात, तर लातूरमध्ये लातूर-उस्मानाबाद सीमेवरील मुरूड पिंपरी, जायफळ, बोरगाव या परिसरात सीडिंग करण्यात आले. मात्र, ढग विरळ असल्याने आर्द्रता कमी असल्यामुळे या ठिकाणी प्रयोगास यश आले नाही.

सी डॉपलर रडारने कळणार ढगांची अचूक माहिती
हाँगकाँगमध्येअडकून पडलेले सी डॉपलर रडार बुधवारी रात्री साडेसात वाजता मुंबई विमानतळावर आले. गुरुवारी सकाळी साडेनऊला ते औरंगाबादमध्येे दाखल झाले. त्यानंतर दिवसभर त्याचे सुटे भाग बसवण्याचे काम सुरू होते. कन्सल्टंट रामवीर शर्मा यांनी सांिगतले की, रडारच्या माध्यमातून ढगातील आर्द्रता कळणार आहे. त्यामुळे रडारच्या माध्यमातून कोणत्या ढगात किती पाणी आहे आणि विमान कोणत्या दिशेने चालले आहे याची संपूर्ण माहिती मिळेल.

असा झाला पाऊस
चार ऑगस्ट
> शेवगाव- १४.६
> एरंडगाव (शेवगाव) - ३३
> नेवासा खुर्द - १२
> माजलगाव अडगाव - ३०
> लिंबागणेश - १७
पाच ऑगस्ट
> नांदवली(शिरूर कासार) - ११
> माजलगाव मंडळ - ०७
> तांबा राजोरी मंडळ (पाटोदा) - ०५
> चकलांबा मंडळ - ०७
बातम्या आणखी आहेत...