आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतीत नवखे झाले कारभारी, आमदार बंब यांचे उमेदवार नाकारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर येथे विजयी उमेदवार बाळू राऊत, गौतम चोपडा यांनी जल्लोष केला. - Divya Marathi
पंढरपूर येथे विजयी उमेदवार बाळू राऊत, गौतम चोपडा यांनी जल्लोष केला.
वाळूज - वाळूज परिसरातील ग्रामपंचायतींसाठी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये बहुतेक ग्रामपंचायतींत मतदारांनी सत्ताधाऱ्यांना नाकारले. यंदा नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. वाळूज ग्रामपंचायतीत मतदारांनी आमदार प्रशांत बंब यांच्या पॅनलमधील उमेदवारांना नाकारले. रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीत मात्र बंब यांच्या पॅनलने एकहाती सत्ता मिळवली. येथे उमेदवार निवडून आले, तर जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीतील विद्यमान सरपंच योगेश दळवी बिनविरोध निवडून आले. वाळूज परिसरातील जोगेश्वरी, वाळूज, पंढरपूर, रांजणगाव शेणपुंजी, वळदगाव, लांझी, नारायणपूर, पाटाेदा आदी ग्रामपंचायतींसह २१ ग्रामपंचायतींचे कारभारी निवडण्यासाठी ऑगस्ट रोजी मतदान झाले. त्यात जोगेश्वरी, वाळूज, रांजणगाव शेणपुंजी या आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्रामपंचायती आहेत.

रांजणगाव शेणपुंजी
आमदार प्रशांत बंब यांचे वर्चस्व सिद्ध झाले असून १७ पैकी ०९ जागा मिळवल्या. विद्यमान सरपंच कांताबाई जाधव या विजयी झाल्या आहेत. त्यांचे पती अशोक जाधव हेही विजयी झाले असून त्यांच्या पॅनलने पाच जागा पटकावल्या. अशोक शेजूळ, कांचन कावरखे, भीमराव कीर्तिकर, सुभाष सोनवणे, दीपक बडे, दीपक सदावर्ते, नंदा बडे, ज्ञानेश्वर वाघमारे, मोहनीराज धनवटे, मंगलाबाई लोहकरे, दत्तू हिवाळे आदींचा विजेत्यांमध्ये समावेश आहे.

गोलवाडी
गोलवाडी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सुनील कीर्तिशाही विजयी झाले. गुलालाची उधळण करत त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. बाबा धोंडरे, सोमनाथ हिवाळे, किशोर कणिसे, हुकूम सलामपुरे, राधेश्याम कणिसे, देवीलाल मुंगसे, राम सलामबाद, सुनील चापे यांची उपस्थिती होती.

पाटोदा
पाटोदा ग्रामपंचायतीत विष्णू राऊत, कुसुम मातकर, चंदन राजपूत, किशोर पेरे, कल्याण पेरे, उज्ज्वला जमधडे, चंद्रकांत पेरे, पुष्पाबाई पेरे हे निवडून आले, तर मीरा पवार, सुनीता पेरे, भाग्यवंत हे बिनविरोध विजयी झाले.

पंढरपूर
अप्पासाहेब साळे पाटील, अख्तर शेख, महेबूब चौधरी, शमीमबी चौधरी, गौतमसेठ चोपडा, संगीता खोतकर, गुलाब पटेल, पूजा राजू उबाळे, मीरा गिऱ्हे, महेंद्र खोतकर, बाळू राऊत, नूरजहाँ मस्तान शहा, अंजिराबी शेख, तस्लिमा शेख, लता कानडे, नीता पवार, अनिल खोतकर विजयी झाले.

वळदगाव
पंचायत समिती सदस्य गणेश पाटील नवले यांच्या पॅनलने जागांवर विजय मिळवला. नारायणसिंग डांगर, सीमा पहाडिया, राजू घोडके, संगीता खोतकर, गुंफाबाई खोतकर, कांताराव नवले, विष्णू झळके, उत्तम खोतकर, सुभद्राबाई साबळे, गयाबाई राऊत, नूरजहाँ शेख यांचा विजेत्यांमध्ये समावेश आहे.

वाळूज
वाळूजला आमदार प्रशांत बंब यांच्या पॅनलचा एकही उमेदवार विजयी झाला नाही हे विशेष. वाळूज ग्रामपंचायतीत सुभाष तुपे, कविता सोनवणे, संगीता पाठे, सायराबी पटेल, मीना सोनवणे, पपीन माने, नंदकुमार राऊत, सोनाली रवी मनगटे, सचिन काकडे, फय्याज कुरेशी, आशा संजय शिंदे, विजया बनकर, अमिनाबी पठाण, अनिल साळवे हे विजयी उमेदवार पहिल्यांदाच ग्रामपंचायतीत निवडून आले. जुन्या पदाधिकाऱ्यांपैकी खालेद पठाण सईदाबी पठाण हे दोघे विजयी झाले.

जोगेश्वरी
विद्यमान सरपंच योगेश दळवी हे बिनविरोध निवडून आले. प्रवीण दुबिले, विलास नरवडे, मीना पन्हाड, हरिदास चव्हाण, कल्याण साबळे, ज्ञानेश्वर कर्डिले, लोहकरे, बांेबले, रमेश सोनकांबळे, सोमनाथ वाघमारे हे प्रथमच विजयी झाले आहेत. हरिभाऊ काजळे, नजीरखाँ पठाण, सूर्यभान काजळे, मंगलाबाई ज्ञानेश्वर नीळ, राजेंद्र सरोवर यांनी दुसऱ्यांदा ग्रामपंचायतीत प्रवेश केला.

बातम्या आणखी आहेत...