आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध देशी दारू घेऊन जाणारी रेनाँल्ड कंपनीची क्विएड कारचा अपघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडाळा :  वैजापुर तालुक्यातील खंडाळा नजिक मगर वस्ती रस्तालगत असलेल्या रिलायंस
 कंपनीच्या  फोर जी केबलसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात एम एच २० इ इ . ४२८२ या क्रमांकाची रेनाँल्ड कंपनीची क्विएड कार सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान जावून अडकली यात कोणतीही जीवित हानी झाली नसून या गाडीत २२ देशी दारूचे बॉक्स आढ़ळुन आले असून पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस स्टेशनकडून मिळालेले सविस्तार वृत्त असे की वैजापुर तालुक्याचे 
उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल लांजेवार यांना खब-या कडून माहिती मिळाली होती की येवला-वैजापुर मार्गावरून कसाबखेडाकड़े जाणारी रेनाँल्ड कंपनीची क्विएड एम एच २० इ इ . ४२८२ या क्रमांकाची कार मध्ये अवैधरित्या देशीदारू घेऊन जात असल्याची माहिती मिळाली असल्याने त्यांनी या गाडीच्या मागावर वेगवेगळ्या मार्गावर पथक तैनात करण्यात आले होते. 

परंतु खंडाळा येथील मगर वस्ती रस्त्यालगत पथक शोध घेत असलेल्या कारचा अपघात
 झाल्याची माहिती कळताच घटना स्थळी पथक दखल झाले असता यामध्ये २२ देशी दारू
(भिंगरी) बॉक्स आढळुन आले असता सर्व मुद्दे मालासह दारू वाहून नेणारारा मधन स्वरुपचंद नागलोट  वय ३५ वर्ष रा.पिवळवाची वाडी हल्ली मुक्काम कसाबखेडा ता गंगापुर याच्यासह एकुण दोन लाख बारा हजार आठशे रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. अपघात रेनाँल्ड कंपनीची क्विएड एम एच २० इ इ . ४२८२ या क्रमांकाची कार पोलिसांनी मुद्दे मालासह ताब्यात घेतलेली आहे. 
बातम्या आणखी आहेत...