आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगाव: लग्न वऱ्हाड घेऊन जाणारी लक्झरी बस गेली खड्ड्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव- अमरावती येथून मलकापूर येथे लग्नासाठी बसने वरात गेली होती. तेथून परत अमरावतीकडे जात असतांना टेंभुर्णा फाट्याजवळ बसला टँकरने कट मारल्याने बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस खड्ड्यात जावुन पलटी झाली. यामध्ये १२ जण जखमी घटना काल २८ फेब्रुवारी रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास घडली. 

अमरावती येथून मलकापूर येथे लग्नासाठी आलेले वरात बसने काल रात्री परत जात होते. दरम्यान टेंभुर्णा फाट्याजवळ बसला टँकरने बसला कट मारला. त्यामुळे बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटला बस खड्ड्यात जावुन पलटी झाली. तेथुन कोलोरीवरुन दुचाकीने खामगावकडे जात असलेले सामाजिक कार्यकर्ते रवि जोशी यांना टेंभुर्णा जवळील खड्ड्यामधून आवाज आला. त्यांनी दुचाकी थांबवित त्या ठिकाणी जावुन बघितले असता त्यांना काही पुरुष अपघात जखमी अवस्थेत लक्झरी बस पलटी झालेली आढळुन आली. त्यांनी तात्काळ १०८ क्रमांकावर संपर्क साधत रुग्णवाहिकेला पाचारण केले. तद्नंतर त्यांनी ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधुन झालेल्या अपघाताची माहिती दिली. 

यावेळी रुग्णवािहकेद्वारे जखमींना घेवुन सामान्य रुग्णालयात दाखल केले. या बसमध्ये ३० ते ३५ पुरुष होते. महिलांना पुर्वीच अमरावती येथे रवाना करण्यात आले होते. तर अपघातानंतर बसचा चालक त्याठिकाणी आढळुन आला नाही. अपघातात १२ जण जखमी झाले. यामध्ये सुभाष चावरे, अमृत निंदाणे, राजेश पाराशर, नरेशराव खलीलकर, सोनु चावरे, रोहित गाहेर, पंडीत शर्मा, वासुदेव तंबोले आदींचा समावेश आहे. यामधील काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना त्वरित अकोला हलविण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...