आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता महावितरणच्या 50 कोटी रुपयांतून तरी रस्ते दुुरुस्ती करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आधीच खराब रस्ते. त्यात कधी विविध खासगी कंपन्यांच्या केबलचे खोदकाम, कधी जलवाहिनी दुरुस्तीसाठी, तर कधी ड्रेनेज दुरुस्तीसाठी खोदकाम. अशा विविध कामांसाठी सातत्याने जवळपास सर्वच रस्त्यांवर आरपार नाल्या खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील एकही रस्ता धड राहिलेला नाही. त्यातच पावसाळा सुरू असल्याने त्यात पाणी साचते. त्यामुळे तर वाहन चालवताना खड्ड्याचा अंदाजच येत नाही. 

शिवाय सदोष पॅचवर्क उखडून आणखी खड्डे पडत आहेत. आता महावितरण शहरभरात भूमिगत केबलचे जाळे पसरवणार आहे. त्यासाठी पुन्हा रस्ते फोडून नाल्या केल्या जाणार आहेत. केबल कंपन्यांनी ४८ कोटी रुपये दिले होते. मात्र, त्यातून रस्ते दुरुस्ती झाली नाही. महावितरण आधीच आपल्या कामासाठी ५० कोटी रुपये देणार आहे. निदान आता तरी त्या पैशांमधून रस्ते सदोष पद्धतीने दुरुस्त व्हावेत ही अपेक्षा. 
 
नियोजन करताच झालेली शहराची वाढ, अरुंद खराब रस्ते आणि खाबूगिरी करण्यासाठी वर्षानुवर्षे होणारे सुमार पॅचवर्क. यामुळे खड्ड्यांची समस्या औरंगाबादकरांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. जलवाहिनी, ड्रेनेज, कधी खासगी नळ कनेक्शन तर कधी खासगी कंपन्यांचे वारंवार खोदकाम सुरूच राहते. दुरुस्ती झाल्यावर खड्डे, आरपार नाल्या तशाच ठेवल्या जातात. 
 
कंपन्यांकडून पैसे घेऊनही मनपाने कामे केली नाहीत 
विविधखासगी संदेशवहन कंपन्यांनी तीन वर्षापूर्वी भूमिगत केबल टाकण्यासाठी शहरभरात जवळपास सर्वच रस्त्यांवर खोदकाम केले. या कंपन्यांनी खोदकामाचे पैसेही मनपाजवळ जमा केले. यापोटी जवळपास ४८ कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले. मात्र, त्या बदल्यात मनपाने रस्त्यांवर झालेल्या आरपार नाल्या आणि खड्डे काही बुजवले नाहीत. काही ठिकाणी पॅचवर्क केले, पण तेही निकृष्ट. त्यामुळे पूर्वीपेक्षाही जास्त धोकादायक खड्डे बहुतांश रस्त्यांवर झाले आहेत. केबलसाठी केलेल्या आरपार नाल्या पाणी साठून पूर्वीपेक्षाही जास्त मोठ्या धोकादायक झाल्या आहेत. 
 
नवे कनेक्शन, जलवाहिनीची समस्याही तेवढीच कारणीभूत 
पाण्याच्याटाक्यांपासून विविध भागांत पाणीपुरवठा करण्यासाठी शहरभर गल्लीबोळात भूमिगत जलवाहिन्यांचे जाळे पसरले आहे. जुन्या आणि नव्या शहरात फार पूर्वीपासून असलेल्या या जुनाट वाहिन्या खराब झाल्याने त्या सतत कुठेना कुठे लिकेज होतात. त्यातून पाणी नासाडी तर होतेच, शिवाय वारंवार त्यांच्या दुरुस्तीसाठी नव्या वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदले जातात. मात्र एकदा काम झाले की रस्ते दुरुस्ती केली जात नाही. 
 
भूमिगत गटार योजनेनेही केली रस्त्यांची खराब अवस्था 
मनपाचाविद्युत विभाग, महावितरण, बीएसएनएल यांचीही अधूनमधून केबल दुरुस्तीसाठी खोदकाम होते. यातच भर पडली ती भूमिगत गटार योजनेच्या कामाची. या कामासाठी २८८ किमी अंतराइतके रस्त्यांवर खोदकाम विविध रस्त्यांवर केले गेले. काम झाल्यावर काही मोजके अपवाद वगळता रस्ते दुरुस्ती व्यवस्थित झाली नाही. त्यामुळे खड्ड्यांनी आरपार नाल्यांनी पुन्हा डोके वर काढले. 
 
आता महावितरणची भर 
हेसगळे असतानाच आता महावितरण कंपनी शहरभर भूमिगत केबलचे जाळे पसरवणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहराचे खोदकाम होणार आहे. त्यामुळे शहरभरात बहुतांश रस्त्याच्या मधोमध अशा आणखी आरपार नाल्या आणि खड्ड्यांची भर पडणार आहे. 
 
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, थेट सवाल- सिकंदर अली (प्र. शहर अभियंता, मनपा)  
 
बातम्या आणखी आहेत...