आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच अपार्टमेंटमधील भरदुपारी तीन घरे फोडली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- कौलखेडमधील स्कुल ऑफ स्कॉलरच्या बाजूला असलेल्या आनंदसागर अपार्टमेंटला सोमवारी भरदुपारी चोरट्यांनी लक्ष केले. या अपार्टमेंटमधील तीन प्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज चोरून नेला. खदान पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

सोमवारी दुपारी पहिल्या माळ्यावरील समोरासमोर असलेल्या फ्लॅट नंबर १०३ मधील रहिवासी नंदकिशोर नानोटे हे कामानिमित्त बाहेर गेले होते. तर त्यांच्या पत्नी मुलांना घ्यायला शाळेत गेल्या होत्या. दरम्यान, चोरटे आले अन् त्यांनी दाराचे कुलूप तोडले. त्यांनी घरातील ४५ ग्रॅ वजानाचे सोन्याचे मंगळसूत्र सात हजार रुपये रोख असा एक लाख सात हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. राजेश ढाकरे यांच्या फ्लॅट नंबर १०५ चा दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार हजार रुपये रोख २४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच सचिन चव्हाण यंाच्या घरातील १४ ग्रॅम वजनाची पोथ १० हजार रुपये राेख असा ५५ हजार रुपयांचा एेवज चोरून चोरट्यांनी पळ काढला. घटनेची माहिती योगेश फरफट यांनी खदान पोलिसांना दिली. 

पोलिसांनी घटनासथळ गाठून घटनेचा पंचनामा केला. डॉग स्कॉड घटनास्थळावर पोहचले होते.उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गजानन शेळके यांनी तपास सुरु केला असून चोरट्यांना लवकरच जेरबंदद करण्यात येईल अशी माहिती शेळके यांनी िदली. 
बातम्या आणखी आहेत...