आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेल्हाऱ्यात एकाच रात्री झाल्या दोन घरफोड्या, दोन लाखांचा ऐवज लंपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा- पोलिसस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सात्काबाद नाथनगर येथील दोन घरात चोरट्यांनी घरफोडी करून जवळपास दोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना १२ फेब्रुवारीच्या रात्री घडली. 

सात्काबाद येथील रहिवासी वरुची काशीराम खेडकर यांच्या घरी रवीवारच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी ५० हजार रुपये नगदी, ४५ ग्रॅम सोने असा ऐवज घराचे कुलूप तोडून लंपास केला. नाथनगर येथील सुरेश पदवाड यांच्या घरी कोणी नसल्याचे हेरून चोरट्यांनी मुख्य दारासह आतील तीन कुलुपे तोडून घरातील कपाट पेट्यांमधील २० ग्रॅम सोने, वस्तू, नगदी चार ते पाच हजार रुपये लंपास केले. त्याची तक्रार त्यांचे जावाई श्याम जोशी यांनी तेल्हारा पोलिसांत दिली. पोलिसांनी चोरीची माहिती मिळताच घटनास्थळ घटनास्थळ गाठून पाहणी केली. पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांच्या मार्गदर्शनात गणपत गवळी, नागोराव भागे, सुरेश काळे, विनोद गोलाईत करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...