आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला चोरांनी खिसा कापला, पोलिसांना पाहताच फेकले पैसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पैठण ते औरंगाबाद प्रवासात चार महिलांनी जीपमधील सहप्रवाशांचा खिसा कापला खरा, परंतु पोलिसांना पाहताच अटक होण्याच्या भीतीने गर्भगळीत झालेल्या या महिलांनी हडपलेले दोन हजार रुपये अन्य प्रवाशाच्या अंगावर फेकले. तरीही त्यांना पकडून पाेलिस ठाण्यात नेण्यात आले. मात्र, तक्रार देण्यास कुणीही पुढे आले नसल्याने “त्या’ महिलांना सोडून देण्यात आले. सोमवारी (दि. ६) सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास लिंक रोडवर ही घटना घडली. 

आंध्र प्रदेशातील चार महिला सकाळी पैठणहून काळी-पिवळीने औरंगाबादकडे येत होत्या. त्यांच्यासोबत असलेल्या सहप्रवाशाचा खिसा कापून त्यांनी दोन हजार रुपये लांबवले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रवासी आणि महिलांमध्ये वाद सुरू झाला. लिंक रोडपर्यंत आलेल्या काळी-पिवळी जीपमधील प्रवाशाने दोन चार्लींना पाहून जीप थांबवली. चार्लीला माहिती दिल्यानंतर महिलांना तेथेच थांबवून ठेवण्यात आले. महिला असल्याने चार्लीने घटनास्थळी दामिनी पथकाला पाचारण केले. पोलिसांना पाहून महिलांनी चोरलेले दोन हजार रुपये संबंधित प्रवाशाच्या अंगावर फेकले. रुग्णालयात जाण्याची घाई असल्याने तो प्रवासी तेथून निघून गेला. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...