आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेचा शिपाईच चोर, 16 लाख 50 हजार हस्तगत; पाचोड येथील बुलडाणा अर्बन बँक चोरी प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड- दि. ६ एप्रिल रोजी येथील बुलडाणा अर्बन को-अॉपरेटिव्ह बँकेच्या तिजोरीत ठेवलेली साडेसोळा लाखांची रक्कम चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीप्रकरणी बँकेचा शिपाईच मुख्य चोर निघाला असून त्याने शेतात पुरून ठेवलेली रक्कम पोलिसांनी हस्तगत केली. विशेष म्हणजे बँकेच्या रोखपालास संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, तो  निर्दोष असल्याचा निर्वाळा पोलिसांनी शनिवारी दिला.  

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर  पाचोड येथे बुलडाणा अर्बन बँकेची शाखा आहे. गतवर्षापासून ग्राहकांच्या सेवेसाठी ही बँक सुरू करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाने येथे खाते उघडून दैनंदिन व्यवहार सुरू केले. दैनंदिन बँकेतील व्यवहाराची तपासणी केल्यानंतर बँकेतून दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात ते ७ एप्रिलच्या दरम्यान बँकेच्या स्ट्राँग रूमच्या कपाटातील कॅश -एकूण रक्कम  १६ लाख ५० हजार २१०  पैकी १६ लाख ५० हजार ४१०  गायब झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी व बँकेच्या वरिष्ठांनी बँकेत झालेल्या चोरीच्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी  कोणतेही पुरावे सापडून आले नसल्याचे दिसून आले. तसेच सर्व बाजूंनी चोरी झाल्याचे धागेदोरे आढळून आले नव्हते. बँकेचा कॅशियर एकनाथ सुदाम चव्हाण आणि शिपाई कृष्णा विष्णू एरंडे (रा. पाचोड, ता.पैठण) यांच्याकडे बँक व  तिजोरीच्या चाव्या असल्याने त्यांनीच बँकेचे शटर व स्ट्राँग रूम आणि कॅश कपाट उघडून यातील रक्कम चोरून नेल्याचे संशय बळावल्याने बँकेचे विभागीय व्यवस्थापक प्रभाकर उत्तमराव कोलते (४६, रा.औरंगाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित  बँकेचे कॅशियर  एकनाथ चव्हाण, कर्मचारी कृष्णा एरंडे (रा.पाचोड)  यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना पैठणच्या न्यायालयासमोर उभे केले असता. न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपीने १४ एप्रिल रोजी घटनास्थळी जाऊन लपवून ठेवलेली रक्कम दाखवून दिली.

खड्ड्यात रक्कम
पोलिस आरोपींची कसून चौकशी करत होते. आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच बँकेचा शिपाई कृष्णा विष्णू एरंडे (२६, रा.पाचोड) याने पैसे चोरी केल्याची कबुली दिली. त्याने चोरी केल्यानंतर  पाण्याच्या जारमध्ये साडेसोळा लाखांची चोरलेली रक्कम टाकून अंबड फाट्याजवळील डाॅ. रावका यांच्या शेतात खड्डा करून ती पुरून ठेवली होती.
बातम्या आणखी आहेत...