आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच दिवसांत घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास, कुलूपबंद घर, दुकाने लक्ष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- चोरट्यांनी गेल्या पाच दिवसांमध्ये वाळूज परिसरात धुमाकूळ घातला आहे. दोन घरे आणि एक दुकान फोडून रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. दोन दिवसांपूर्वी जोगेश्वरीतील घरफोडीची घटना ताजी असताना गजबजलेल्या कामगार चौकातील कदम मोबाइल शॉपी राजनंदिनी वडापाव स्टॉलचे पत्रे उचकटून १६ हजार ६०० रुपये रोख आणि ४७ हजार ५० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १५ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. 

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी वाळूजला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती. मात्र, आता वाढत्या घरफोड्या लूटमारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

पाचदिवसांत तीन चोऱ्या...
पहिलीघटना १० एप्रिल रोजी मध्यरात्री पंढरपुरातील गणेशनगरात घडली. त्यात चोरट्यांनी नूरजहांबी शहा यांच्या घरातून रोख दीड लाख रुपये दोन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. दुसरी घटना जोगेश्वरी येथील शमशुल हक गफूर यांच्या घरी १४ एप्रिल रोजी मध्यरात्री घडली. घरातून रोख २४ हजार रुपये, ४१ हजार रुपयांचे दागिने असा ऐवज लंपास केला. 

चोरटे सीसीटीव्हीत कैद 
अंदाजे२० ते २५ वर्षीय चोरट्याच्या सर्व हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या असून त्याआधारे पोलिस तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच शहरातील ठसेतज्ज्ञांनी पाहणी केली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...