आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहिणीत खरिपासाठी शेतकऱ्यांची लगबग, भर उन्हामध्ये मशागत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री- मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाने काही प्रमाणात सगळीकडे हजेरी लावल्याने आणि रोहिणी नक्षत्र गुरुवार, २५ मेपासून सुरू झाल्यामुळे जगाचा पोशिंदा खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीसाठी लगबग करत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. 
 
यापूर्वी मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. १-२ वेळा मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा कुटुंबीयांसह शेतातील नांगर, कुळवणी, जमीन सपाटीकरण, बांध बंदिस्ती आदी मशागतीची कामे करण्यात मग्न झाला आहे. मान्सूनचे आगमन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतातील कामे आटोपून घेण्यासाठी बैलजोडीबरोबरच ट्रॅक्टरचाही वापर करत आहेत. सध्या मान्सूनसदृश स्थिती निर्माण होऊ लागली आहे. पशुधन कमी झाल्याने ट्रॅक्टरद्वारे कामे आटोपण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. यामुळे अशी अद्ययावत अवजारे घरोघरी दिसू लागली आहेत. खरीप हंगामासाठी मशागतीची सुरुवात खऱ्या अर्थाने याच नक्षत्रापासून सुरू होते. रोहिणी नक्षत्राच्या पावसाने जमिनीत वापसा तयार होऊन मृग नक्षत्रातील पेरणीस योग्य असे वातावरण तयार होते. त्यामुळे पेरणी केलेले बियाणे जमिनीत रुजण्यास मदत होते. रोहिण्या पाऊस चांगला होऊन मृग नक्षत्रात पेरणी झालेल्या पिकाचे कमी खर्चात अमाप पीक हाती येते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. 
 
भर उन्हामध्ये मशागत 
सध्या तपमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने भरउन्हात चटके सहन करत बळीराजा पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. यंदा मान्सून वेळेपूर्वीच येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी मशागतीच्या कामाला लागले. 
 
बातम्या आणखी आहेत...