आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: घरे पाडली, 100 कोटींच्या जागेवरही ताबा, पण मनपाने रस्ता केलाच नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या दोन आठवड्यांपासून जळगाव रस्त्यावरील सर्व्हिस रोड मोकळा करण्यासाठी पाडापाडी सुरू आहे. अनेकांचे बळी घेणाऱ्या बीड बायपासच्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे काढण्याचे काम लवकरच हाती घेण्याचे मनपाने जाहीर केले. मात्र, दीड वर्षापूर्वी अनेक घरांची अतिक्रमणे जमीनदोस्त केल्यावर जयभवानीनगर - मुकुंदवाडी रस्त्याचे नूतनीकरण केलेच नाही. चार महिन्यांपूर्वी गाजावाजा करत राजाबाजार-जिन्सी रस्ता रुंदीकरणात बांधकामे हटवण्यात आली. मात्र, तेथेही डांबरीकरण झालेले नाही. दोन्ही ठिकाणी बाजारभावानुसार सुमारे १०० कोटी रुपये किमतीची जागा मनपाने ताब्यात घेतली आहे. 
 
परंतु जयभवानीनगर - मुकुंदवाडी रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात गेल्याने, तर जलवाहिनी स्थलांतराला मुहूर्त लागत नसल्याने राजाबाजार - जिन्सीचे काम रखडल्याचे सांगण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे ऑक्टोबर २०१५ मध्ये जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रस्ता ८० फूट रुंद करण्यासाठी मोहीम झाली. तेव्हा महिनाभरात रस्ता नूतनीकरण होईल, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले होते. दीड वर्षानंतर जैसे थे स्थिती आहे. मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाकडे खड्ड्यांतून जावे लागते. डिसेंबर २०१५ मध्ये हा रस्ता आमदार अतुल सावे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला आणि मनपाने कामातून अंग काढून घेतले. 
 
कादिला राष्ट्रीय प्राधिकरणाकडे? : पालिकेकडेनिधीची कमतरता असल्याने हा रस्ता चांगला झाला नसता. दुसरीकडे महामार्ग प्राधिकरणाने सिडको बसस्थानक ते बीड बायपास रस्ता करण्याचे ठरवले. त्यात या रस्त्याचे काम करण्याची तयारी दर्शवली. प्राधिकरणाकडून रस्त्याचे काम चांगले होईल यात शंका नाही, परंतु ते काम सुरू होते कधी हाच प्रश्न आहे. जयभवानीनगरच्या नगरसेविका मनीषा मुंडे म्हणाल्या की, या रस्त्याची निविदा प्रक्रिया मे किंवा जूनअखेर होईल. 
 
हीमोहीमही अर्धवटच : विकास आराखड्यानुसार जुन्या शहरातील रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेत मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी डिसेंबर २०१६ रोजी राजाबाजार येथील संस्थान गणपती ते गंजे शहिदा मशिदीपर्यंत ५० फूट रुंदीकरणाचे काम हाती घेतले.
 
मार्च अखेरपर्यंत नवा रस्ता उपयोगात येईल, असा दावा बकोरियांनी केला होता. आतापर्यंत १४० मालमत्ता पाडण्यात आल्या. पाच जणांनी टीडीआर, वाढीव एफएसआयऐवजी रोख मोबदलाच हवा, असे म्हणत मालमत्ता देण्यास विरोध केला. शिवाय एक धार्मिक स्थळ हटवण्यात आले असून अजूनही तीन धार्मिक स्थळे तशीच आहेत. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, ८० हजार चौरस फूट जागा महापालिकेच्या ताब्यात आणि ओमप्रकाश बकोरिया, मनपा आयुक्त व अतुलसावे, आमदार यांची प्रतिक्रिया... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...