आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीई : पहिल्या टप्प्यात 5551 मुलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली, पहिलीपूर्वच्या २५ टक्के जागांच्या प्रवेशासाठी सोमवारी पहिला लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यात जिल्ह्यातील ५५५१ मुलांच्या इयत्ता पहिलीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. २९३ शाळांसाठी ही सोडत काढण्यात आली होती. दरम्यान, जिल्ह्यातील ५१ शाळांसाठी एकही अर्ज आला नसून १२५ शाळांमध्ये क्षमतेपेक्षा कमी अर्ज आल्याने थेट प्रवेश देण्यात आल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले. 

वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पालकांच्या मुलांना नामवंत, दर्जेदार शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी शिक्षण हक्क कायदा तयार करण्यात आला आहे. त्यात पालकांच्या घरांपासून एक ते तीन किलोमीटर परिघातील खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. मात्र, काही खासगी शाळांकडेच पालकांचा प्रचंड ओढा असतो. तेथे मर्यादित जागा असतात. त्यामुळे नेमका कोणी प्रवेश घ्यावा यावरून वाद होऊ शकतो. हे लक्षात घेऊन सोडत पद्धतीने प्रवेश निश्चित करण्याचे ठरले. 

त्यानुसार यंदाचा पहिला लकी ड्रॉ आज जगतगुरू संत तुकाराम नाट्यगृहात काढण्यात आला. चार बाऊलमध्ये ठेवण्यात आलेल्या मुलांच्या अर्जांच्या (कोड क्रमांक) चिठ्ठ्या ठेवण्यात आल्या होत्या. त्या लहान मुलांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काढण्यात आल्या. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, प्राथमिक शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल, सुनीता सावळे, आर. व्ही. ठाकूर, श्रीकांत दीक्षित आदींची उपस्थिती होती. 

नोंदणीसाठी अवधी
याप्रवेशासाठी शाळांना ऑनलाईन नोंदणीसाठी १६ जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत तर पालकांसाठी फेब्रुवारी ते मार्चपर्यंतचा अवधी देण्यात आला होता. जिल्ह्यातील ४६९ शाळांनी नोंदणी केलेली असून, या शाळांमध्ये हजार ५५१ जागांची क्षमता आहे. यंदा हजार ५६६ अर्ज आले आहेत. 

यापैकी ५१ शाळांमध्ये पहिलीच्या वर्गासाठी तर शाळांमध्ये पहिलीपूर्व वर्गासाठी एकही अर्ज आला नाही, अशी माहिती सावळे यांनी दिली. तर १२५ शाळांसाठी जागांच्या तुलनेत कमी अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यामुळे तिथे सरळ प्रवेश देण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी सांगितले. 

त्या शाळांची तक्रार करा 
आर्दड म्हणाले की, अनेक शाळा आरटीईमध्ये प्रवेशासाठी टाळाटाळ करतात. नंतर फीसाठी त्रास देतात. अशा अनेक तक्रारी मागील वर्षी आल्या होत्या. त्यामुळे आता प्रवेश टाळणाऱ्या, वाढीव शुल्काची मागणी करणाऱ्या, विशिष्ट दुकानांतून पुस्तके, गणवेश खरेदीसाठी आग्रह धरणाऱ्या शाळांची तक्रार केल्यास कडक कारवाई केली जाईल. आरटीईचे प्रवेश डावलून इतरांना त्या जागेवर प्रवेश देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द केली जाईल. 

मोबाइलवर एसएमएस 
शिक्षण विभागाने पहिल्या ड्रॉ मधील प्रवेश निश्चित करून लगेच थेट पुणे येथील एनआयसी कार्यालयाशी संपर्क साधला. त्यात संधी मिळालेल्या पालकांना मोबाइलवर एसएमएसद्वारे दोन ते तीन दिवसात उर्वरित माहिती कळवण्यात येईल. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता करत पालकांना १५ दिवसांत प्रवेश घ्यावा लागेल. त्यानंतर उर्वरित जागांची माहिती शाळांनी दोन ते तीन दिवसांत शिक्षण विभागास कळवायची आहे, असेही मोगल म्हणाले. 

पुढील ड्रॉ १४ मार्चला 
आणखी३०१५ मुलांचा प्रवेश निश्चित होणे बाकी आहे. दुसरा लकी ड्रॉ १४ मार्च, तिसरा २४ मार्च, चौथा एप्रिल, पाचवा १८ आणि सहावा २० एप्रिल रोजी होईल. त्यामुळे पहिल्या ड्रॉमध्ये संधी मिळाली नाही म्हणून निराश होण्याचे कारण नाही, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

- ५१ शाळांना एकाही पालकाची नाही पसंती 
- २५% जागांच्या प्रवेशासाठी सोमवारी पहिला लकी ड्रॉ काढण्यात आला. 
- १२५ शाळांमध्ये थेट प्रवेश 
बातम्या आणखी आहेत...