आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी बसून होतील आरटीओतील कामे, नोव्हेंबरपासून सुरु होईल कामकाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रादेशिक परिवहन विभागाचे ४.० सारथी फास्ट सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा स्पीड वाढवण्यात येत आहे. २० नोव्हेंबरपर्यंत सारथी पूर्णपणे अपडेट होणार असून २१ पासून नागरिकांना घरबसल्या अर्ज भरणे, अपॉइंटमेंट घेणे आदी कामे करता येणार आहेत. सर्व कामे ऑनलाइन होणार आहेत.
परवान्यासाठी अर्ज, वाहन नोंदणी, परवान्याची कागदपत्रे ऑनलाइन सादर करणे, वाहन चाचणी अपॉइंटमेंट घेता यावी, सर्व शुल्क भरणे यासह विविध सेवा सुविधा घरबसल्या उपलब्ध करून देण्यासाठी जुन्या सारथी सेवेच्या ऐवजी ४.० सारथी सेवा अपडेट करण्याचे काम १७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले. वाहन सॉफ्टवेअर प्रणाली कार्यान्वित केली आहे. परीक्षेसाठी अर्ज करून तारीख घेणे, पक्का परवाना, नूतनीकरण, दुय्यम परवाना, परवान्या संदर्भातील इतर माहिती सर्व ऑनलाइन करण्यात आले आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी सांगितले.
यासाठी पूर्वीच्या sarathi.nic.in या वेबसाइटऐवजी parivahan.gov.in या वेबसाइटवर जावे. म्हणजेच : parivahan.gov.in वेबसाइटवर जा. ऑनलाइन सर्व्हिस + सारथी सर्व्हिसवर जावे. त्यानंतर ऑनलाइन अपॉइंटमेंट, अपलोड डाक्युमेंट, अपॉइंटमेंट, फी पेमेंट असे आपल्याला हवे तसे ऑप्शन निवडता येतील. ऑनलाइन अपॉइंटमेंटमधून शिकाऊ पक्क्या परवान्यासाठी अर्ज करता येईल. तसेच सर्व अपॉइंटमेंटचे वेब अॅप्लिकेशन नंबर बदलणे जरुरीचे असल्याने उमेदवारांनी सारथी वेबसाइटवर जाऊन फॉर न्यू एलएल अपॉइंटमेंट आॅलरेडी होल्डिंग अपॉइंटमेंटस फॉर एमएच २० आरटीओ औरंगाबाद या लिंकवर क्लिक करून नवीन वेब अॅप्लिकेशन नंबर मिळवावा.
काय होणार फायदा?
आरटी ओतील गर्दी कमी होणार आहे. दलालांना चाप बसेल, नागरिकांची लूट थांबण्यास मदत होईल, कामकाजात पारदर्शकता येइल, भ्रष्टाचारालाही आळा बसेल, डेडलाइनप्रमाणे कामे होतील. या सुविधेचा औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतील नागरिकांना फायदा होणार.
बातम्या आणखी आहेत...