आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साई प्रकरणी विद्यापीठीय अधिकाऱ्यांवर ठपका नाही; शिरसाट समितीचा अहवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : चौका येथील साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या बोगस परीक्षेच्या स्कँडलमध्ये परीक्षा विभागातील कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी नाही. त्यामुळे सत्यशोधन समितीने फक्त ‘साई’ व्यवस्थापनावरच ठपका ठेवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेत शनिवारी परीक्षा मूल्यमापन मंडळाची बैठक घेण्यात आली, त्यात अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. 
 
‘साई’ प्रकरणी स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीने शुक्रवारी कुलगुरूंना अहवाल सादर केला. त्यानंतर कुलगुरूंनी परीक्षा विभागात आयोजित बैठकीत अहवाल मांडला. सुमारे १५ पानांच्या अहवालात परीक्षा विभागातील शुक्राचार्यांना मात्र क्लीन चिट देण्यात आली.
 
‘साई’ला परीक्षा अर्जाच्या विलंबापोटी आकारण्यात येणारे लाखो रुपयांचे शुल्क माफ करण्यात आले होते. त्यामुळे परीक्षा विभाग आणि साईच्या व्यवस्थापनाचे काही लागेबांधे आहेत का, हे तपासण्याचे काम कुलगुरूंनी समितीवर सोपवले होते. डॉ. एम. डी. शिरसाट समितीचे अध्यक्ष होते.
 
फक्त ‘साई’चे व्यवस्थापन त्यासाठी कारणीभूत असून त्याशिवाय दुसरे काहीही समितीच्या निदर्शनास आलेले नाही. दरम्यान, हा अहवाल आता २० जूनच्या विद्या परिषदेच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. या समितीत डॉ. साधना पांडे आणि डॉ. प्रवीण वक्ते यांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...