आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विक्रीकर विभागाकडून पावत्यांची तपासणी! नोटा बंदी होताच झाले कोट्यवधींचे व्यवहार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबरला रात्री आठ वाजता पाचशे हजाराच्या नोटांवर बंदीचा निर्णय जाहीर करताच शहरातही रात्री उशिरापर्यंत अनेकांनी महागड्या वस्तू खरेदीसह सोने खरेदीचा सपाटा लावला. या सर्व व्यवहारातील खरेदी-विक्रीच्या पावत्या तपासण्याची मोठी मोहीमच विक्रीकर विभागाने हाती घेतली आहे. नोव्हेंबरसह पुढील काही दिवसांत नेमकी किती उलाढाल झाली, याचे रेकॉर्ड हा विभाग गोळ करत अाहे. ही कारवाई विक्रीकर विभागासह प्राप्तिकर विभाग अत्यंत गोपनीय पद्धतीने करीत आहे. मात्र, प्राप्तिकर विभागातील अधिकारी सध्या तरी मौन बाळगून आहेत.
विक्रीकर विभागाच्या वतीने गेल्या पंधरा दिवसांपासून व्यापाऱ्यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार तपासले जात आहेत. माल खरेदी विक्रीच्या पावत्या हा सर्वात मोठा आधार या व्यवहारांची तपासणी करण्यासाठी गृहीत धरला जात आहे. दररोज एक-एक सेगमेंट तपासला जात आहे. यात सोने, चांदी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स ते कार खरेदीचे व्यवहारही तपासले जात आहेत. विक्रीकर सहआयुक्त डी.एम.मुगळीकर यांनी सांगितले की, हे व्यवहार तपासणे आमचे कामच आहे. यात आम्ही ॉबनाॅर्मल व्यवहार िकती झाले हे तपासत आहोत. त्याचे आकडे कळण्यास वेळ लागेल. कारण सर्व पावत्यांची बारकाईने तपासणी सुरू आहे. उदाहरणार्थ एका दिवसात एरवी तीन कोटींचे सोने विकले गेले असेल तर ते एकाच पावतीवर एका व्यक्तीने घेतले काय किंवा विविध पावत्या फाडून एकाच व्यक्तीने घेतले काय, याचा शोध सुरू आहे.

प्राप्तिकर विभागाचे नो काॅमेंट्स : विक्रीकरविभागाप्रमाणेच प्राप्तिकर विभागही अशीच तपासणी करीत असल्याची चर्चा आहे. मात्र त्याविषयी कुणीही उघड बोलत नाही. या विभागाचे अधिकारी नो काॅमेंट्स, असेच बोलत आहेत. आम्हाला सध्या कोणत्याही सूचना नाहीत, एवढेच ते सांगतात.

एकाच दिवशी ४२ लाखांचा कर जमा
विक्रीकर विभागाने सोमवारी जुन्या नोटांसह करभरणा मोहीम सुरू केली. युनियन बँकेने २४ पर्यंत तेथे काउंटर उघडले असून पहिल्याच दिवशी ३१ व्यापाऱ्यांनी ४२ लाख ४६ हजार ५९५ रुपये इतका विक्रीकर भरला. या विशेष काउंटरचे उद््घाटन विक्रीकर सहआयुक्त डी.एम.मुगळीकर, युनियन बँकेचे मुख्य व्यवस्थापक प्रवीण वेणुगोपाल यांनी केले. या वेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा, करसल्लागार संघटनेचे अध्यक्ष विलास कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
बँक काऊंटरचे उद‌्घाटन करताना डी. एम. मुगळीकर.
बातम्या आणखी आहेत...