आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक करणारे पाच ट्रक केले जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज पोलिसांच्या ताब्यात दिलेले अवैध वाळू उपसा करणारे हायवा ट्रक. छाया : दिव्य मराठी - Divya Marathi
वाळूज पोलिसांच्या ताब्यात दिलेले अवैध वाळू उपसा करणारे हायवा ट्रक. छाया : दिव्य मराठी
वाळूज- वाळूजपरिसरातून चोरट्या मार्गाने वाळू उपसा करून ती विक्रीसाठी घेऊन जात असताना गंगापूर तहसील कार्यालयाच्या पथकाने पाच हायवा ट्रक जप्त केले. सर्व ट्रक वाळूज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांना दंड सुनावला जाणार आहे. त्यातुन सुमारे लाख ७५ हजार रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होणार असल्याची माहिती गंगापूरचे तहसीलदार दिनेश झांपले यांनी गुरुवारी दिली.

वाळूज एमआयडीसीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर कंपन्यांसह घरांची बांधकामे केली जात आहेत. त्यामुळे सध्या वाळूला सोन्याचा भाव आला आहे. ही संधी साधून वाळू चोरांनी परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू केला आहे. त्यासाठी मध्यरात्रीनंतरची वेळ साधली जात आहे. शिवाय महसूल विभागाच्या पथकावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी खास चारचाकींमधून युवकांचा ताफा ठेवलेला आहे. महसूल विभागाचे वाहन दिसताच त्यांच्यावर दबा धरून बसलेला युवकांचा ताफा ही माहिती तत्काळ वाळू वाहतुकीच्या चालकांना देतो. त्यामुळे चालक वाळू वाहतुकीचे वाहन तातडीने लगतच्या शेतामध्ये वळवून आडोसा पाहून उभे करतो. त्याचबरोबर जर नगर-औरंगाबाद महामार्गावर वाहन असेल तर लगतच्या पेट्राल पंपावर चोरट्या वाळूचे वाहन उभे करण्यात येते. अशा पद्धतीने महसूल विभागाची नजर चुकवून मागील अनेक वर्षांपासून बिनदिक्कतपणे वाळू उपसा सुरू आहे.

पाचपट दंड वसूल करणार
चोरट्यावाळू उपशाचे पाच हायवा ट्रक गंगापूर तहसील कार्यालयाने जप्त केले. ही पाचही वाहने वाळूने भरलेली असून ती वाळूज पोलिसांच्या ताब्यात आहेत. या वाहनांमध्ये प्रत्येकी किमान ते ब्रास वाळू भरलेली आहे. सध्या परिसरात वाळूला तीन हजार रुपये प्रतिब्रास असा भाव आहे, तर पकडलेल्या वाहन मालकांकडून आजच्या बाजारभावाच्या पाचपट दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक ट्रकमागे किमान ७५ हजार रुपयांचा दंड वसूल होणार आहे. परिणामी महसूल विभागाच्या तिजोरीत लाख ७५ हजार रुपये जमा होणार असल्याचे गंगापूरचे तहसीलदार दिनेश झांपले यांनी स्पष्ट केले. तर अशी कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाळूज पोलिसांनी चोरट्या वाळू वाहतुकीच्या वाहनांची नोंद घेतल्याचे ठाणे अंमलदार जी. एस. पाटील ढोले यांनी सांगितले.

महसूल विभागाने पकडली वाहने
गंगापूरतहसील कार्यालयाचे वाहन पाहिल्यानंतर गुरुवारी (१२ ऑगस्ट) सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे चोरट्या वाळू उपशाचे दोन्ही हायवा ट्रक (एमएच १२ ईएफ ३१२३) (एमएच २० डीर्इ ३१८०)लगतच्या पेट्रोल पंपावर वळवून थांबवण्यात आले. मात्र, महसूल विभागाच्या वाहनात तहसीलदार दिनेश झांपले हे स्वत: पथकासह होते. त्यामुळे त्यांचे लक्ष पेट्रोल पंपावर वळवलेल्या दोन्ही वाहनांकडे होते. तेव्हा त्यांनी दोन्ही ट्रक जप्त करून ते वाळूज पोलिसांच्या ताब्यात दिल्या. आठवडाभरापूर्वी तीन ट्रक (एमएच २० बीटी ११३१, एमएच २० एटी ७७००, एमएच २१ वाय २३२७) चोरट्या मार्गाने वाळू उपसा करून विक्रीसाठी नेताना पकडण्यात आले होते. ते ट्रकही वाळूज पोलिसांकडे देण्यात आल्या आहेत.