आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदारांच्या आदर्श ग्राममध्ये अंगणवाडी भरते उघड्यावर, मुलांचे आरोग्य धाेक्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाचनवेल- ग्रामीणभागातील बालकांना शिक्षण मिळावे, पोषण आहार मिळावा, शिवाय अंगणवाडी इमारतीचे बांधकाम व्हावे यासाठी शासन लाखो रुपये खर्च करते; मात्र येथील अंगणवाडी क्रमांक फकीरवाडी (मदार वस्ती) आडगाव येथील अंगणवाडीला अद्यापही इमारत नसल्याने चक्क उघड्या जागेवर अंगणवाडीतील बालके बसत आहेत. विशेष म्हणजे हे गाव खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतले असून या गावातच चिमुकल्यांच्या शिक्षणाची हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

जून २०१३ पासून सुरू झालेली ही अंगणवाडी किरायाने घेतलेल्या इमारतीत भरत होती. किरायदाराने इमारत रिकामी करून घेतल्याने मुले बाहेर पटांगणातच झाडाखाली बसत आहेत. येथे शौचालयाची व्यवस्था नसल्याने बालकांची गैरसोय होत आहे. ते वर्षे वयोगटातील ४२ लाभार्थी या अंगणवाडीत आहे. उन्हाचा पारा तापत असल्याने बालके आजारी पडण्याची भीतीसुद्धा नाकारता येत नाही. अंगणवाडी बांधकाम करण्याबाबत संबंधित विभागातील वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकांमधून केली जात आहे. 

११ आॅक्टोबर रोजी जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्ताने देशभरातील प्रत्येक खासदाराने सांसद आदर्श ग्राम योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यात औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिसाद देत सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेले कन्नड तालुक्यातील आडगाव (पिशोर) हे गाव दत्तक घेतले. दि. २६ डिसेंबर २०१४ रोजी विशेष भूमिपूजनाचा विविध लोकोपयोगी योजनांचा थाटात शुभारंभ करण्यात आला होता. दोन वर्षे मुदत असलेल्या या योजनेला दोन वर्षे उलटून गेली तरी गावाचा कायापालट दिसून येत नाही. यात ४० प्रकारच्या योजना गावात राबविण्याचा संकल्प होता. महसूलच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून सूक्ष्मकृती आराखडा तयार करण्यात आला. सुरुवातीच्या सहा महिन्यांत कामे जोरात सुरू झाली. 

परंतु नंतर कामे खोळंबून पडली आहेत. बसस्थानक ते मुख्य गावात जाण्यासाठी चांगला रस्ता, बसस्थानक निवारा, पाणंदमुक्त रस्ते, राष्ट्रीयीकृत बँक, ग्रामसचिवालय, आरोग्य उपकेंद्र, गुरांचा दवाखाना, सिंचनासाठी जास्तीचे प्रयत्न, अंगणवाडी इमारती आदी कामे दिवास्वप्नच राहिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या योजनेला १७ मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने महिनाभरात काय कामे होतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. 

आडगाव (पि.)येथील अंगणवाडी इमारतीसाठी निधी उपलब्ध असून गावपातळीवर जागा उपलब्ध झाल्यावर सर्व सुविधा असलेली नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. जागा उपलब्ध झाल्याबरोबर हा प्रश्न सुटणार आहे.
- मीरा महाले, प्रकल्प अधिकारी, 

साथीचे आजार पसरण्याची भिती 
आमच्यामुलांनाउघड्यावर अंगणवाडीत बसावे लागत असून मिळणारा पोषण आहारही मुले तेथेच खातात. यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. नवीन इमारतीचे तत्काळ बांधकाम करावे.
- काकासाहेब शिवाजी भोसले, पालक 

आगामी बैठकीत पर्याय काढू 
फकीरवाडी(मदारवस्ती) येथील अंगणवाडी इमारतीचा निधी ग्रामपंचायतीकडे आला असून जागेअभावी पडून आहे. येणाऱ्या मासिक बैठकीत पर्याय काढून मार्चअगोदर कामास सुरुवात करणार आहोत.
- संतोष भिकनराव भोसले, उपसरपंच, आडगाव पिशोर 
बातम्या आणखी आहेत...