आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"संत एकनाथ' निवडणुकीसाठी खासदार दानवेंनी कंबर कसली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- तालुक्याचे राजकारण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याभोवती फिरते. नेत्यांचे राजकारण हे नेहमीच कारखान्यावर आधारित राहिल्याने दोन महिन्यांनंतर होणाऱ्या कारखाना निवडणुकीच्या तयारीला सध्या सर्वच राजकीय पुढारी लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आमदार संदिपान भुमरे, माजी आमदार संजय वाघचौरे, भाजपत दाखल झालेले तुषार शिसोदे यांच्यासह सध्या १८ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर कारखाना चालवण्यास घेतलेले सचिन घायाळ यांनी स्वतंत्र पद्धतीने कारखान्याच्या दोन महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीची तयारी केली आहे. त्यामुळे कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यात नवीन नेतृत्वाची नांदी होणार असल्याची चिन्हे आहेत.

पैठण तालुका हा राजकीय नेतृत्वहीन म्हणून ओळखला जातो. कारखाना ताब्यात म्हणजे आमदारकी आपलीच, अशी भावना आतापर्यंत नेत्यांची असल्याने कारखाना ताब्यात घेण्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. कारखाना ताब्यात आला तर इतर कोणत्या निवडणुकीला कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या कामगार व शेतकरी यांचे एकगठ्ठा मतदान सहज मिळते. हाच विचार करून त्यांनी कबंर कसली आहे.
नवीन चेहऱ्यासाठी भाजपची तयारी
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जालना मतदारसंघात पैठण तालुक्याचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर दानवे यांना अवलंबून राहावे लागते. हाच विचार करून दानवे यांनी कारखान्याच्या माध्यमातून सचिन घायाळ यांना पुढे करत आपली राजकीय खेळी सुरू केली आहे. यामुळे कारखान्याची निवडणूक शिवसेना- भाजपतील दरी वाढवणारी ठरणार आहे.