आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स. भु. शिक्षण संस्थेत नेमणार मानद अध्यक्ष, घटनादुरुस्ती करून संरक्षक सदस्याचा प्रस्ताव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शतक महोत्सवीवर्ष साजरे करणारी सरस्वती भुवन शिक्षण संस्था वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एकीकडे जमीन विक्रीत गैरव्यवहाराचा ठपका ठेवून अशोक भालेराव यांना निलंबित करण्यात आले असून दुसरीकडे संस्थेच्या नियामक मंडळामध्ये तहहयात मानद अध्यक्ष आणि संरक्षक सदस्य नियुक्तीसाठी घटनेत दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर करण्याच्या हालचाली होत आहेत. संस्थेच्या सरचिटणीसांना एक हजार रुपयांपर्यंत खर्चाचे अधिकार आहेत. ही रक्कम वाढवून एक लाख रुपयांपर्यंत खर्चाचे अधिकार देण्याचाही प्रस्तावही संस्थेच्या घटना दुरुस्तीत आहे.
 
अब्जावधी रुपयांची मालमत्ता आणि अगणित ज्ञान संपदा असलेल्या या संस्थेची पाच जुलै २०१७ रोजी सर्वसाधारण सभेत घटना दुरुस्ती प्रस्तावांवर जोरदार चर्चा झाली. मात्र, अंतिम निर्णय होऊ शकला नाही.
 
संस्थेचे विद्यमान सरचिटणीस अॅड. दिनेश वकील यांनी जारी केलेल्या विषयपत्रिकेत जुन्या, नव्या कलमांचा तपशील आहे. त्यापैकी काही असे.
सध्याचे कलम : (१) : संस्थेचेउद्देश मान्य असलेल्या शैक्षणिक क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्या २१ वर्षांवरील व्यक्तीस, स्वयंसेवी संस्थेस नियामक मंडळाच्या संमतीने घातलेल्या अटी पूर्ण केल्यावर सभासद होता येईल. सभासदत्वाचा अर्ज नियामक मंडळाने नामंजूर केल्यास त्याची कारणे दाखवणे आवश्यक राहणार नाही.
 
नवे कलम : सभासदत्वाच्यानिमंत्रणासाठी नियामक मंडळ एक समिती नेमेल. संस्थेचे उद्दिष्ट मान्य असून ज्यांची संस्थेच्या कामकाजात मदत होईल अशांना सभासद होण्याची विनंती केली येईल. त्या व्यक्तीच्या नावास मंडळाने संमती दिल्यावर आणि त्या व्यक्तीने सभासद शुल्क जमा केल्यावर ती व्यक्ती सभासद झाली, असे समजले जाईल.
 
सध्याचे कलम : (१) - सन्माननीय सभासद : शैक्षणिकक्षेत्रात काम केलेल्या, शैक्षणिक प्रश्नासंबंधी आस्था असलेल्या ज्या संबंधी नियामक मंडळाने सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे, अशा व्यक्तीस नियामक मंडळाची मुदत संपेपर्यंत सभा सन्माननीय सभासदत्व बहाल करू शकेल. मात्र, अशा सभासदांची संख्या एकावेळी पाचपेक्षा अधिक असणार नाही.
 
नवे कलम : शैक्षणिकक्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या ज्याचे मार्गदर्शन संस्थेला उपयोगी पडेल अशा व्यक्तीस सन्माननीय सभासद होण्याची विनंती केली जाईल. त्यास कोणतेही सभासदत्व शुल्क असणार नाही. त्या व्यक्तीस नियामक मंडळ, सर्वसाधारण सभेस हजर राहता येईल, पण निवडणुकीला उभे राहता येणार नाही. शिवाय संस्थेच्या अभिवृद्धीसाठी विशेष योगदान देणाऱ्यास कार्यकारी मंडळ, संरक्षक मंडळ तहहयात संरक्षक सदस्य म्हणून नियुक्त करू शकेल. संस्थेच्या कामकाजात कार्यकारी मंडळास वेळोवेळी सल्ला देण्याचा अधिकार संरक्षकास असेल. 
 
तहहयात मानद अध्यक्षपदासाठी नवे कलम (२) असे
सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिलेल्या सभु संस्थेचा सभासद असलेल्या महनीय व्यक्तींना सभु शिक्षण संस्थेचे मानद अध्यक्षपद बहाल करू शकेल. हे पद तहहयात राहील. 
बातम्या आणखी आहेत...