आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुना घोटाळा लपवण्यासाठी केला नवा घोटाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एकाजमिनीच्या प्रकरणात तलाठी, तहसीलदार आणि एका लिपिकाने आधी चुकीचे फेरफार नोंदी घेतल्या. माहिती अधिकारातून या बाबी उघड झाल्यावर या चुका लपवण्यासाठी पुन्हा चलाखी करत चुकीच्या नोंदी दाखवत स्वत:चेच पितळ उघडे केले आहे. त्यामुळे याप्रकरणी पुन्हा दुसरा गुन्हा या सर्वांवर दाखल झाला आहे. दोनदा गुन्हे दाखल होऊन चार महिने उलटले तरी अद्याप याप्रकरणी पोलिस मात्र फक्त चौकशी सुरू आहे, असेच उत्तर देतात. तक्रारदार निर्णय मागत आहेत, तर गुन्हे दाखल असलेले निर्दोष असल्याचे सांगतात. मात्र, प्रकरणाची चौकशीच होत नसल्याने ‘न्याय’ होत नाही हे निश्चित.
लेबर कॉलनी येथील रहिवासी रफिक अहमद मोहंमद उस्मान यांची गेवराई गट क्रमांक ११ येथे दोन हेक्टर गुंठे जमीन आहे. रफिक यांनी त्यांच्या काही मित्रांकडून उसने पैसे घेतले होते. त्या मोबदल्यात त्यांना जमिनीचे नाममात्र खरेदीखत त्यांनी करून दिले होते. दरम्यान, हे खरेदीखत रद्द करण्यापूर्वीच त्यांच्या मित्राचा मृत्यू झाला. प्रकरण न्यायालयात गेले आणि २००२ मध्ये कौटुंबिक वाद संपुष्टात येऊन ते रद्द करण्यात आले. हा सर्व प्रकार झाल्यानंतर रफिक यांच्या जमिनीवर माेहंमद हिशाम या दुसऱ्या व्यक्तीने मालकी हक्काचा दावा केला. हे प्रकरण पुन्हा न्यायालयात गेले. सुरुवातीला न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल माेहंमद हिशाम यांच्या बाजूने दिला. या निकालाविरुद्ध रफिक मोहंमद वरच्या न्यायालयात गेले. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना रफिक यांनी महसूल विभागाला या प्रकरणात कोणतेही फेरफार नोंदी घेऊ नयेत, अशी मागणी केली होती., तरीही मोहंमद हिशाम यांनी तहसीलदार विजय राऊत, तलाठी प्रशांत पानसरे, लिपिक विजय शहाणे यांच्या मदतीने बनावट दस्तऐवज तयार केले. याअाधारे जमिनीचे फेरफार केल्याचे उघड झाले. न्यायालयालने तहसीलदार विजय राऊत, तलाठी प्रशांत पानसरे, लिपिक विजय शहाणे मोहंमद हिशाम आदींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली. यात १५६ (३) नुसार कलम १२० (ब) १६७, २०४, २१७, २१८, २१९,, ४१८, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७०, ४७१ आणि ३४ आदी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

मोहंमद हिशाम यांच्या अर्जावर लिपिक विजय शहाणे यांनी तहसीलदारांची स्वाक्षरी घेऊन फेरफारासंदर्भातील पत्र २७ मे २०१४ रोजी त्यांना दिले. हिशाम यांनी हे पत्र घेऊन तलाठी कार्यालय गाठले. तेथे पत्रानुसार तलाठी प्रशांत पानसरे यांनी हिशाम यांची फेरफार नोंद रजिस्टरवर नोंदवून घेतली. परंतु या पत्राची नोंद तहसील कार्यालयात नाही. दुसरी बाब म्हणजे तहसीलदार विजय राऊत यांनी याच दिवशी म्हणजे अशा कुठल्याही पत्रावर सही केली नसल्याचे डीबी स्टारच्या तपासातून समोर आले आहे. मात्र, २७ मे २०१४ रोजीच्या पत्रावर तहसीलदारांनी जून २०१४ रोजी सही केल्याची नोंद आहे. त्यामुळे हेच पत्र अधिकृत असल्याचे तहसीलदार सांगतात; पण या पत्राची फेरफार रजिस्टरवर नोंद नाही. त्यामुळे आधीच्या बोगस पत्रावरच फेरफाराची नोंद झाली. त्या पत्रावर तहसीलदार म्हणून सही कुणी केली हा प्रश्न आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे तहसीलदारांनी स्वत: सही केलेल्या या पत्राची नोंद का घेतली गेली नाही हादेखील संशयास्पद मुद्दा आहे.

{ २७ मे २०१४ चे पहिले पत्र जे बोगस असल्याचा तहसील कार्यालयाचा दावा.
{ तहसील कार्यालयातून २७ मे २०१४ रोजीच्या बोगस पत्राची मात्र तलाठी कार्यालयाच्या रजिस्टरवर नोंद.
{ तहसीलदार राऊत यांनी सही केलेल्या अधिकृत पत्राची मात्र कोठेच नोंद नाही.
{ तलाठ्याने नोंद घेतलेल्या रजिस्टरवर खाडाखोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न.

पाचव्या महिन्यानंतरही त्यांचा ‘तपास’ सुरूच
२३जुलै २०१६ रोजी मोहंमद हिशाम, तहसीलदार विजय राऊत, तलाठी प्रशांत पानसरे लिपिक विजय शहाणे यांच्याविरुद्ध सर्व पुरावे सादर करून तक्रार दिली. सिटी चौक पोलिसांनी या प्रकरणात सीआरपीसी ४२०, ४२५, ४६५, ४६८, ४७१, १२० बी, २०४, ४१७, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविला. दरम्यान येथे पोलिसांनी सरकारी बाबूंवर सोयीस्कर गुन्हा नोंदवता मोहमद हिशाम यांना मुख्य आरोपी बनविले उर्वरिताना इतरमध्ये टाकले. अशा गुन्ह्यामध्ये पोलिस नावे टाकून तत्काळ संबंधितांना अटक करतात; मात्र या प्रकरणात गेल्या चार महिन्यांपासून ‘तपास’ सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांना चौकशीत नेमकी काय अडचण आहे हेही कळायला मार्ग नाही.

हेच ते तहसीलदारांचे पत्र ज्यात त्यांची अधिकृत स्वाक्षरी आहे, पण या पत्राची नोंद मात्र कार्यालयात नाही.
तहसीलदारांची सही नसलेले हेच ते बोगस पत्र, पण या पत्राची नोंद मात्र फेरफार वहीत घेण्यात आली आहे.
आपल्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे...
नाही,अद्याप याबाबत मला काही माहिती नाही.
आपणसही केलेल्या पत्राची नोंद का नाही?
माझ्यासमोरन्यायविभागाचा अभिप्राय घेऊन तयार केलेले पत्र ठेवले गेले. मी रीतसर त्यावर सही केली तर काय बिघडते? माझे काम पत्र तपासून त्यावर सही करणे हे आहे. आता ते पत्र नोंदी घेण्याचे काम इतरांचे आहे. पत्राची नोंद का घेतली नाही हे त्यांनाच विचारा. माझा दोष काय ते सांगा?
पणआपल्या पत्राची नोंद नाही, मात्र आपली सही नसलेल्या पत्राची सरकार दरबारी नोंद कशी होते?
मलाहीआश्चर्य वाटत आहे. या प्रकरणात कागदाचा खेळ करून आम्हाला विनाकारण त्रास दिला जात आहे. सुरुवातीला उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवालही सादर केला आहे. यात आम्ही आमचे म्हणणे मांडले आहे. यात नव्याने जिल्हाधिकाऱ्यांनी एकदाच चौकशी लावावी आणि दोषी असलो तर तत्काळ कारवाई करावी,अशी विंनती केली आहे.
पणतुमचा तर पहिल्या चौकशीवर आक्षेप आहे...
असूद्या, आता नव्याने चौकशी करून सोक्षमोक्ष लावावा. जे होईल त्याला आम्ही तयार आहोत.
तपास सुरू आहे
आम्हीयाप्रकरणीगुन्हे नोंदवले आहेत. इतरमध्ये असलेल्या तलाठी, लिपिकांसह इतरांची चौकशी सुरू केली आहे. प्रकरणाचा तपास सुरू असल्याने अधिक बोलता येणार नाही. एस.के. पंडित, सिटीचौक पोलिस ठाणे
डीबी स्टारकडे असलेले पुरावे
कुठल्याही कार्यालयाचे कामकाज प्रत्येक टप्प्यावर पाळल्या जात असलेल्या शिस्तीमुळे सुरळीत चालते; पण औरंगाबाद जिल्हा प्रशासनात मात्र प्रचंड अनागोंदी असल्याचे काही प्रकरणांच्या तपासावरून स्पष्ट होते. वरिष्ठांचे आदेश पाळणेच नव्हे तर थेट पायदळी तुडवणे सुरू असूनही कोणत्याही स्तरावर कारवाई केली जात नाही. कुठलीही शिस्तभंगाची कारवाई होत नाही. सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, एसडीएम स्तराच्या अधिकाऱ्यांचे आदेश, अशासकीय पत्रही धुडकावण्याचा प्रकार सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या कारभारातील अनागोंदीचे उदाहरण देणारी ही मालिका...
गेवराईतील जमिनीचे प्रकरण... तहसीलदार, तलाठी आणि लिपिक झाले सहआरोपी
पुन्हा दुसरा गुन्हा दाखल
रफिकअहमद यांनी महसुली कागदपत्रांमध्ये कोणतीही नोंद घेऊ नये, असा आक्षेप नाेंदवल्यानंतर लिपिक तलाठी स्तरावर अनधिकृत नोंदीची तक्रार अगोदर दाखल झाली होती. या संपूर्ण प्रकरणात आपण दोषी असल्याचे लक्षात येऊ नये, म्हणून पुन्हा कागदपत्रांत बदल करण्यात आला. माहिती अधिकारात समोर आलेल्या कागदपत्रात अनियमितता दिसते. जमीन मालकीचा दावा करणाऱ्या मोहंमद हिशाम यांनी तलाठी प्रशांत पानसरे यांना दिलेले फेरफार करण्याचे पत्रच बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मोहंमद हिशाम यांनी तहसीलदारांचे २७ मे २०१४ रोजीचे बोगस पत्र आणले कोठून आणि त्यांची रीतसर नोंद केली कुणी असा प्रश्न उपस्थित होतो. विशेष म्हणजे या पत्रावर तहसीलदारांची सही नाही. तहसीलदारांची बनावट सही करणारा हा महाभाग कोण, हा खरा प्रश्न आहे. हा प्रकार पाहून पोलिसही सुरुवातीला बुचकळ्यात पडले हाेते. कागदपत्रांमध्ये घोटाळा लक्षात आल्यानंतर सीटी चौक पोलिसांनी फसवणूकप्रकरणी दुसरा गुन्हा २३ जुलै २०१६ रोजी दाखल करून घेतला. पोलिसांनी यात मोहंमद हिशाम यास मुख्य आरोपी बनविले, तर लिपिक शहाणे, तलाठी प्रशांत पानसरे तहसीलदार विजय राऊत यांना मात्र इतर आरोपीत ठेवले.
बातम्या आणखी आहेत...