आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद-शाळकरी मुलीचा विनयभंग; 24 तासांत दोषारोपपत्र दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शाळकरी मुलीला परस्पर शाळेतून घेऊन जाऊन तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक करून मुकुंदवाडी पोलिसांनी २४ तासांच्या आत दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने शनिवारी आरोपीची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. सुदाम कडुबा घुगरे (२१) असे आरोपीचे नाव आहे. 
 
मुकुंदवाडी भागात राहणारी १३ वर्षीय मुलगी १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शाळेतील कार्यक्रमाला गेली होती. दरम्यान, ती घरी परतली नाही म्हणून आईवडिलांनी तिचा शोध सुरू केला. दुपारी १२ च्या सुमारास ती घरी परतली. आईने तिला कुठे गेली होती, असे विचारले असता तिने शाळेत सुदाम घोगरे याने बळजबरीने सोबत नेले अत्याचाराचा प्रयत्न केला. मी घाबरून त्याच्या तावडीतून पळून आल्याचे तिने सांगितले. त्यानंतर आईवडिलांनी तत्काळ मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक अमोल सोनवणे यांनी गुन्हा दाखल करून घेतला आरोपीचा शोध सुरू केला. उपनिरीक्षक सुषमा पवार, किरण सपकाळे, दीक्षित यांनी त्यास एका गॅरेजवरून अटक केली. तो याच गॅरेजवर काम करतो. पीडितेच्या वडिलांची गाडी दुरुस्त करण्यासाठी तो काही वेळा घरी आला होता. पीडितेची त्याची तोंड ओळख होती. याचाच फायदा आरोपीने उचलण्याचा प्रयत्न केला.
 
 या प्रकरणात लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी आरोपीस अटक केली. २४ तासांच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करून आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायधीश बी. पी. क्षीरसागर यांनी आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 
 
बातम्या आणखी आहेत...