आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शालेय पोषण आहारात ‘स्वीट ड्रायफ्रुट राइस’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा. म्हणून मिड डे मिल ही योजना राबविण्यात येते. त्यानुसार सर्व अनुदानित शाळांमध्ये शालेय पोषण आहार म्हणजेच मध्यान्ह भोजन विद्यार्थ्यांना देण्यात येते. २८ नोव्हेंबर हा दिवस शालेय पोषण आहार योजनेसाठी महत्त्वाचा दिन आहे. त्यामुळे सर्व संलग्नित शाळेत वाचन परिपाठ घेण्यात येणार असून, हा दिवस साजरा करत सर्व विद्यार्थ्यांसाठी मेनू खिचडीसोबतच स्वीट ड्रायफ्रुट राइस विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
मुलांच्या शारीरिक विकास आणि आरोग्य चांगले व्हावे यासाठी पोषण आहार महत्त्वाचा आहे. म्हणून यासंदर्भात २००१ मध्ये २८ नोव्हेंबर रोजी सर्वाेच्च न्यायालयाने एका निकालात भारतातील सर्व विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची जबाबदारी ही सरकारची असून विद्यार्थ्यांना कोरडे धान्य नव्हे तर त्यांच्यासाठी शिजवूनच पोषक असा आहार देण्याची व्यवस्था सरकारने करावी, असा निर्णय दिला होता. या निर्णयानुसार सुरुवातीला पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्यानंतर आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही पोषण आहार लागू करण्यात आला. तसेच पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी यांनी सर्वाेच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करून जगण्याच्या आणि अन्न मिळण्याचा हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. आणि भारत सरकारने याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. त्यास दाद देत २८ नोव्हेंबर २००१ रोजी निकाल देऊन सर्व राज्य सर्व सरकारी अनुदानित शाळांमध्ये प्राथमिक विद्यार्थ्यांना शिजवलेला आहार देणे बंधनकारक करण्यात आले. यानिमित्त हा विशेष दिवस म्हणून आगळावेगळा मेनू पोषण आहारात देण्यात येणार आहे.

भोजन अर्थात पोषण
^२८ नोव्हेंबर रोजी मध्यान्ह भोजन अर्थात पोषण आहारासंबंधीचा निर्णय घेण्यात आला होता. आजही काही भागांमध्ये कुपोषणाची स्थिती बालकांमध्ये आहे.त्यामुळे या दिनानिमित्त शाळांमध्ये इस्कॉनच्या वतीने स्वीट ड्रायफ्रुट राइस देण्यात येईल.तसेच सर्वांपर्यंत हा संदेश पोहचावा यासाठी प्रसार करण्यात येत असून, परिपाठाचे वाचनही करण्यात येणार आहे.तशी माहितीही आम्ही सर्वांना पाठवली आहे. सुदर्शन पोटभरे, व्यवस्थापक, इस्कॉन.

याप्रमाणे पोषण मूल्य देणे अपेक्षित
पहिली ते पाचवीसाठी ४५० ग्रॅम कॅलरीज,१२ ग्रॅम प्रथिने
उच्च माध्यमिक म्हणजे सहावी ते आठवीसाठी ७०० ग्रॅम कॅलरीज आणि २० ग्रॅम प्रथिने
बातम्या आणखी आहेत...