आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय विद्यार्थ्यांनी उभारले स्मार्ट सिटीचे मॉडेल, एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराचा समावेश झाला आहे. शहर स्मार्ट होणार म्हणजे नेमके काय होणार? त्यात उड्डाणपूल, रस्ते कसे असतील, असा अनेकांना प्रश्न पडतो. त्याचे उत्तर शालेय विद्यार्थ्यांनी दिले. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित सायक्लोन २०१७ प्रदर्शनात त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सादरीकरण केले. 
 
या प्रदर्शनात शहरातील दीडशे शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पदव्युत्तर संशोधक विद्यार्थ्यांप्रमाणे अभ्यास करत त्यांनी प्रयोग सादर केले. यात प्रामुख्याने हवामानाची माहिती देणारा रोबोट, ड्रोन कॅमेऱ्याचा समावेश होता. स्मार्ट सिटी प्रकल्पाने सर्वांचे लक्ष वेधले होते. 
भविष्यात औरंगाबादमध्ये उड्डाणपूल, रस्ते, चौक कसे असावेत याचे मॉडेल चर्चेचा विषय बनले होते. महान भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही.रमण यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी एमआयटी संस्थेतील बी. टेक. महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी सायक्लोन या नावाने शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करतात. 
 
गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. त्यामध्ये शहरातील सर्वच शाळांना सहभागी होण्याचे निमंत्रण दिले जाते. यंदा औरंगाबाद, वाळूज भागातील १५० शाळांतील तब्बल एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. एमआयटी महाविद्यालयाचे तीन मजले या प्रदर्शनाने भरले. एका विद्यार्थिनीच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या वेळी एमआयटी संस्थेचे संचालक यज्ञवीर कवडे, डॉ. शकुंतला लोमटे, प्राचार्य एस. पी. भोसले, समन्वयक संदीप हिवाळे, प्रा. शिल्पा कोटगिरे, प्रा. एन. एन. गाडेकर, डॉ. पी. बी. बोरा, प्रा. पी. एम. अंबड यांची उपस्थिती होती. 
बातम्या आणखी आहेत...