आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा तेथे शौचालय अभियानाची लक्ष्यपूर्ती हुकली , सरकारला आतापर्यंत ६१% यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लाल किल्ल्यावरून प्रथमच देशाला संबोधित करताना गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१५ पर्यंत देशातील प्रत्येक शाळेत शौचालय राहील, असे जाहीर केले होते. याकामी सरकारला आतापर्यंत ६१% यश मिळाले आहे. शाळा तेथे शौचालय अभियानाची वर्षभरातील लक्ष्यपूर्ती सरकारला साधता आली नसल्याचे चित्र आहे.

स्वच्छ भारत अभियानाला ऑक्टोबर २०१४ मध्ये सुरुवात झाली. यात १५ ऑगस्ट २०१५ पर्यंत देशातील प्रत्येक शाळेत शौचालय असे लक्ष्य सरकारने ठरवले होते. त्यानुसार ४.१८ लाख शाळांमध्ये शौचालये उभारण्याचा निर्णय झाला. मात्र, ऑक्टोबर २०१४ ते ऑगस्ट २०१५ या काळात २.५७ लाख शाळांतच शौचालये उभारणी झाली. केवळ ६१ टक्केच लक्ष्यपूर्ती झाली. सप्टेंबर २०१४ मध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी स्वच्छ विद्यालय अभियानाअंतर्गत शाळा तेथे शौचालय उभारणी करण्याचे जाहीर केले. त्यानुसार मंत्रालयाने नोव्हेंबर २०१४ मध्ये याची कृती अहवाल जाहीर केला. त्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०१४ या काळात ३० हजार शाळांत शौचालये उभारण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले, तर १.५० लाख शौचालये उभारणीचे काम सार्वजनिक उद्योग आणि खासगी कंपन्यांकडे सोपावण्यात आले. यापैकी ८० टक्के शौचालयांची उभारणी मार्चअखेर झाली.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून जाणून घ्‍या टक्‍केवारी आणि इतर माहिती..