आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: मुख्याध्यापिकांवर कारवाई करा बोर्डाच्या संस्थाचालकांना सूचना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बोर्डास निकालाच्या कामासाठी सहकार्य करत नसल्या प्रकारणी आता बोर्डाने थेट ज्या शाळेतील मुख्याध्यापक आहेत. त्यांच्या संस्थाचालकासच मुख्याध्यापकांवर कारवाई करा अशा सूचना दिल्या आहेत. बोर्ड थेट कारवाई करु शकत नसल्याने असा पावित्रा घेण्यात आला आहे. निकाल ही सर्वांची जबाबदारी आहे.त्यामुळे असे पाऊल उचलण्यात आल्याचे बोर्डाचे अध्यक्ष शिशीर घोनमोडे यांनी सांगितले.
 
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी-बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा नुकत्याच संपल्या आहे. सध्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरु आहे. परंतु काही शिक्षक संघटनांनी टाकलेलया बहिष्कारामुळे अविनाअनुदानित कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक उत्तरपत्रिका तपासणीसाठी सहकार्य करत नसल्याने बोर्डासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. तर जून महिन्यापूर्वीच नियमानुसार निकाल जाहिर करायचा असल्याने बोर्डाने अनुदानित शाळांमधील शिक्षकांनाच अधिकच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी दिल्या आहेत. परंतु निकालावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा विद्यार्थी संख्या देखील दुप्पटीने वाढली आहे. जवळपास सातशे ते आठशे उत्तरपत्रकांचे गठ्ठे बोर्डाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी स्वत: नेवून देवूनही परत आले होते. यावर वारंवार बैठक घेवूनही काहींनी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी स्विकारला केला तर अद्यापही मोठ्या प्रमाणात शिक्षक तपासणीसाठी येत नाहीत. शिवाय अनुदानित शिक्षकांमध्ये तणाव वाढतो आहे. काहींनी तर अतिरिक्त उत्तरपत्रिका तपासणार नाही म्हणून बोर्डातील अधिकाऱ्यांना देखील दम भरला होता. त्यामुळे सहकार्य करणाऱ्यांकडूनच उत्तरपत्रिका तपासण्यात येत आहे. मात्र ज्यांनी सहकार्य केले नाही. अशा शाळांमधील मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात यावी अशा सूचना संस्थांना देण्यात आल्या आहेत. तसे पत्रही पाठविण्यात आले आहे. कारण मुख्याध्यापकाच्या परवानगीनेच सर्व प्रक्रिया होते. त्यामुळे त्यांनाच दोषी धरणार असा पावित्रा आता बोर्डाने घेतला आहे.
 
निकाल वेळेत लावण्याचे आवाहन 
आम्हाला निकाल वेळेत जाहिर करायचे आहेत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे. जर परीक्षा घेणे बोर्डाची जबाबदारी आहे. तर बोर्डास निकालासाठी सहकार्य करावे, उत्तरपत्रिकांची तपासणी करणे ही शिक्षकांची देखील जबाबदारी आहे. अखेर विद्यार्थी त्यांचेच आहे. थेट कारवाई बोर्ड करु शकत नसल्याने या सूचना देण्यात आल्या आहेत.
- शिशीर घोनमोडे विभागीय अध्यक्ष एसएससी बोर्ड.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...