आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायर ब्रिगेड, कर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान; 32 हजार क्विं. बियाणे वाचवण्यात यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
जालना - औद्योगिक वसाहतीतील महाबीजच्या बियाणे प्रक्रिया केंद्राला आग लागून मोठे नुकसान झाले. मात्र आग लागल्याबरोबर महाबीजच्या कर्मचाऱ्यांनी फायर एक्सटिंग्युशर, वॉटर हायड्रंट यांचा वापर करून आग नियंत्रणात ठेवली, तर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत योग्य रस्त्याची निवड करीत ११ व्या मिनिटांत घटनास्थळ गाठले. त्यामुळे जवळपास ३० हजार क्विंटल बियाणे आगीच्या भक्षस्थानी पडण्यापासून वाचविण्यात यश आले.  
औद्योगिक वसाहतीतील एमआयडीसीच्या कार्यालयासमोरच जवळपास अडीच एकर क्षेत्रात महाबीजचे बियाणे प्रक्रिया केंद्र व जिल्हा कार्यालय आहे. या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात तूर, गहू, सोयाबीन आदी पिकांचे बियाणे साठविण्यात आले आहे. यातील काही बियाण्यांवर प्रक्रिया करण्यात आली आहे, तर उर्वरित बियाण्यांची प्रक्रिया करण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी ६.१० वाजता बियाणे प्रक्रिया केंद्रात आग लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर एका कर्मचाऱ्याने याची माहिती दूरध्वनीवरून विभागीय व्यवस्थापक जगदीश खोकड यांना दिली, तर काही कर्मचाऱ्यांनी फायर एक्सटिंग्युशर व वॉटर हायड्रंटचा वापर करून आग नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अवघ्या ११ मिनिटांत अग्निशमन बंब येथे दाखल झाला. त्यानंतर जवळपास दीड तासाच्या प्रयत्नांनंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात यश आले. यात प्रक्रिया केंद्रातील बारदाना,प्लास्टिक बॅग, महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले, तर बियाण्यांच्या पोत्यांचे नुकसान झाले. आग लागल्यानंतर वीज गुल झाल्याने संपूर्ण गोदामात अंधार होता. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...