आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी विभागाच्या निगराणीत आता बियाण्यांची विक्री; गंगापुरात आ. बंब यांच्या उपस्थितीत बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर- तालुक्यातील पुढील खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक होऊन त्यामध्ये टंचाई वाण असलेल्या कापूस व इतर पिकांच्या बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागामार्फत या वाणांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

आमदार प्रशांत बंब, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर, सभापती ज्योती गायकवाड, व्यंकट ठक्के, मधुकर वालतुरे व तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जलयुक्त शिवार अभियान आढावा व खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. बैठकीत दरवर्षी व्यापाऱ्यांकडून बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार करून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी अशा वाणांची यादी करून बियाणे निर्माता कंपनीशी संपर्क करून उपलब्ध करून देणार आहेत.

मागेल त्याला शेततळे  
या बैठकीत तालुक्यात आतापर्यंत ५०६ शेततळ्यांचे कामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले व पुढील काळात १२०० नवीन व मागेल त्याला शेततळे कृषी विभागामार्फत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंपरागत सेंद्रिय शेती अभियानांतर्गत तालुक्यातील ३ गावांची निवड करण्यात आली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, जमीन आरोग्यपत्रिका वितरण अभियान आदींची माहिती देण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...