आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमाच्या हत्येच्या निषेधार्थ सोयगाव कडकडीत बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देऊन नातेवाइकांचा घाटीत ठिय्या दिला होता. - Divya Marathi
मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देऊन नातेवाइकांचा घाटीत ठिय्या दिला होता.
सोयगाव- तालुक्यातील हनुमंतखेडा येथील अल्पवयीन शाळकरी मुलीचा गळा आवळून खून करून मृतदेह घाटनांद्रा घाटात फेकून दिल्याची घटना दि. १५ रोजी उघडकीस आली होती.  या प्रकरणी मृत सीमा राठोड  हिच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी बंजारा गौर सेनेसह हनुमंतखेडा ग्रामस्थांनी सोमवारी (दि.१७) सोयगाव बंदची हाक दिली होती. दरम्यान, व्यापारी व स्टॉल धारकांनी बंद ठेवून शंभर टक्के बंद यशस्वी केला.   

मृत सीमा राठोड या अल्पवयीन चिमुरडीच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी बंजारा गौर सेनेच्या जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ राठोड, राहुल राठोड, करतारसिंह चव्हाण, विनोद जाधव व सामाजिक कार्यकर्ता विलास राठोड यांच्या नेतृत्वात सोयगाव पोलिस स्टेशन येथे उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू (सिल्लोड उपविभाग) यांना निवेदन देऊन पोलिस स्टेशन ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विद्यार्थिनीसह युवकांचा सहभाग  होता. या मोर्चात क्रूर कृत्य करणाऱ्यास कठोर शिक्षा करण्याच्या मागणीच्या घोषणा करण्यात येत होत्या. हा मोर्चा वाल्मीकपुरा, नारलीबाग, शिवाजी चौक, बसस्थानक येथे आल्यावर सभेत रूपांतरित करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...