आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायीसह पाच विषय समिती सदस्यांची बिनविरोध निवड; खासदार, आमदारपुत्रांची वर्णी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्थायी समितीच्या नऊ सदस्यांसह पाच विषय समित्यांच्या प्रत्येकी नऊ सदस्यांची शनिवारी सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. स्थायी समितीमध्ये एकाच वेळी खासदार आणि आमदारपुत्रांची वर्णी लागली आहे. भाजपचे गटनेते म्हणून प्रमोद राठोड यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व सदस्यांची निवड बिनविरोध झाल्याचे सभेचे पीठासीन अधिकारी तथा महापौर भगवान घडामोडे यांनी जाहीर केले. 

स्थायी समितीच्या रिक्त जागांवर मान्यताप्राप्त, नोंदणीकृत पक्षांच्या सदस्यांची निवड करण्यासाठी तसेच पाच विषय समित्यांच्या प्रत्येकी नऊ सदस्यांची निवड करण्यासाठी शनिवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मोहन मेघावाले, रावसाहेब आम्ले, कमलाकर जगताप, गजानन मनगटे, मकरंद कुलकर्णी, नितीन चित्ते आणि विकास एडके यांना स्थायी समितीत दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने ते निवृत्त झाले. तसेच शहर विकास आघाडीचे सदस्य कैलास गायकवाड यांनी राजीनामा दिला. 

निवृत्त राजीनाम्यामुळे रिक्त एका जागेसाठी सदस्यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय लोकशाही आघाडी, भाजप, एमआयएम, शहर विकास आघाडी आणि काँग्रेस या पक्षाच्या गटनेत्यांनी आपापल्या गटाच्या कोट्यानुसार सदस्यांची नावे सुचवली. त्यानुसार शिवसेनेतर्फे स्थायी समिती सदस्य म्हणून रूपचंद वाघमारे, स्वाती नागरे, ऋषिकेश खैरे, रेणुकादास वैद्य आणि सिद्धांत शिरसाट, एमआयएमतर्फे सय्यद मतीन सय्यद रशीद आणि शेख नर्गिस शेख सलीम, भाजपतर्फे राखी देसरडा आणि शहर विकास आघाडीतर्फे गजानन बारवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घडामोडे यांनी जाहीर केले. 

शिवसेनेतर्फे गटनेते मकरंद कुलकर्णी आणि सभागृह नेते गजानन मनगटे यांनी शिवसेना सदस्यांची यादी महापौरांकडे सादर केली. कालच भाजपच्या शहराध्यक्षांनी भाजपच्या गटनेतेपदी प्रमोद राठोड यांची नेमणूक केल्याचे पत्र महापौर घडमोडे यांना दिले होते. त्यानुसार आजच्या निवडणुकीत गटनेते या नात्याने प्रमोद राठोड यांनीच भाजपच्या सदस्यांच्या नावांची यादी महापौरांकडे सुपूर्द केली. एमआयएमतर्फे नासेर सिद्दिकी, काँग्रेसतर्फे भाऊसाहेब जगताप यांनी, तर शहर विकास आघाडीतर्फे गजानन बारवाल यांनी सदस्यांच्या नावांची यादी दिली. तत्पूर्वी महापौर बापू घडामोडे यांनी स्थायी समिती सदस्य कैलास गायकवाड यांचा राजीनामा मंजूर करत त्यांच्या जागी नवीन सदस्य निवडण्याचे आदेश दिले. 

समिती सदस्यांचीही निवड 
महिला बालकल्याण समिती : आशाभालेराव, सीमा चक्रनारायण, सीमा खरात (शिवसेना), कमल नरोटे, ज्योती नाडे (भाजप), शेख समिना शेख इलियास लता निकाळजे (दोघी एमआयएम), रेश्मा अश्फाक कुरेशी (काँग्रेस) आणि विमल कांबळे (शविआ). 

आरोग्य समिती : प्रेमलतादाभाडे, भारती सोनवणे आणि आत्माराम पवार ( शिवसेना), सुरेखा खरात आणि जयश्री कुलकर्णी (दोघी भाजप), तसलीम बेगम अब्दुल रऊफ खान फेरोज मोईनोद्दीन (दोघे एमआयएम), सायली जमादार (काँग्रेस) आणि रमेश जायभाय (शविआ). 

शहरसुधार समिती : ज्योतीअभंग, मनोज बल्लाळ मनीषा लोखंडे (तिघे शिवसेना), अप्पासाहेब हिवाळे माधुरी देशमुख (दोघे भाजप), सायराबानो अजमलखान विकास एडके (एमआयएम), शबनम बेगम कलीम कुरेशी (काँग्रेस) सत्यभामा शिंदे (शविआ). 

शिक्षण समिती : कमलाकरजगताप, रावसाहेब आम्ले आशा निकाळजे (शिवसेना), शोभा वळसे आणि नितीन चित्ते (भाजप), शेख जफर शेख अख्तर खान इर्शाद इब्र्राहिम (एमआयएम), कलीमा बेगम खाजोद्दीन (काँग्रेस) शोभा बुरांडे (शविआ). 

समाजकल्याण समिती : खतिजाबेगम छोटू कुरेशी, सुभाष शेजवळ आणि नितीन साळवी (शिवसेना), बबिता चावरिया विमल केंद्रे (भाजप), सलिमा बानो कुरेशी शेख अब्दुल रहिम नायकवडी (एमआयएम), अनिता साळवे (काँग्रेस) कैलास गायकवाड (शविआ). 
बातम्या आणखी आहेत...