आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेरेब्रल पाल्सीच्या कामामुळे जगाने घेतली ‘विहंग’ची दखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सेरेब्रल पाल्सीग्रस्त विशेष मुलांची विहंग ही शाळा औरंगाबादेत २०११ पासून कार्यरत आहे. ते मुलांपासून सुरू झालेल्या या छोट्याशा रोपाचे चैतन्य मात्र जगाला दखल घ्यायला लावेल, अशा वटवृक्षासारखे आहे. विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या जागतिक स्तरावरील अॅमस्टरडॅम या संस्थेने यू ट्यूबवर नुकताच एक व्हिडिओ जारी केला. त्यात विहंगच्या संचालिका आदिती आणि मुलगा हर्ष शार्दूल झळकले आहेत. त्यांच्या कार्याची जागतिक स्तरावर घेण्यात आलेली दखल सन्मानजनक आहे. जेफ पुलटॉन या कॅनेडियन संगीतकाराने व्हिडिओतील गाणे तयार केले आहे.
सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाअंतर्गत सुरू असलेल्या ओंकार बालवाडीत विहंग ही विशेष मुलांची शाळा भरली. विशेष मुलांना सामान्य मुलांसह शिक्षण देत सामान्यांत आणण्याच्या विचाराने हा प्रकल्प सुरू झाला. आगळ्यावेगळ्या उपक्रमांतून या ग्रुपने संपूर्ण शहराचेच नव्हे तर जगाचेही लक्ष वेधले. ऐतिहासिक वारसा, औद्योगिक वाटचालीमुळे जगाच्या नकाशावर दखल घेतल्या गेलेल्या शहराला आणखी नव्या चेहऱ्याने आदितीने जगापुढे आणले. विशेष मूल म्हटल्यावर हातपाय गाळता जिद्दीने सुरू केलेल्या तिच्या कामाला मिळालेले हे कौतुक वाखाणण्याजोगे आहे. ऑक्टोबरला जागतिक स्तरावर सेरेब्रल पाल्सी दिन साजरा झाला. जगभरातील ९० देशांत हा दिवस साजरा झाला.

६२ देशांतील विविध उपक्रमांची दखल घेणारा व्हिडिओ यानिमित्ताने तयार करण्यात आला. अॅमस्टरडॅमच्या संचालिका रॉबिन क्युमिन्स यांनी सेरेब्रल पाल्सीच्या जगभरातील कामाची माहिती घेत ते जगापुढे आणण्याचा संकल्प केला आहे. अशा मुलांचे मनोरंजनातून शिक्षण व्हावे यासाठी त्या प्रयत्न करत आहेत.

येथे पाहू शकता व्हिडिओ...
यापूर्वी पाल्सी डेच्या निमित्ताने आदिती हर्षचा फोटो जागतिक स्तरावरील पोस्टरमध्ये झळकला होता. आता, यू ट्यूबवरील व्हिडिओतही हे माय-लेक झळकले आहेत. यू ट्यूबवर https/youtube/pAgekTPQrKE तर फेसबुकवरही htts/www.facebook.com/worldCPday या लिंकवर पाहता येईल.
बातम्या आणखी आहेत...