आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: नोकरदार शहरी महिलांचा मॅनेजमेंट कोशंट घसरतोय, ऑफिसमध्ये चिडचिडेपणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- घर आणि कामाच्या ठिकाणी स्वत:ला सिद्ध करण्याच्या प्रयत्नांत महिलांचे भावनिक व्यवस्थापन बिघडत चालले आहे. दोन्ही आघाड्यांवर परफेक्शनिस्ट होण्यासाठी लागणारा ताळमेळ सांभाळताना त्यांची दमछाक होत आहे. यामुळेच भावनिक आंदोलनांचा स्फोट होऊन घर अाणि ऑफिसात महिलांमध्ये चिडचिडेपणा, भांडणे, नैराश्य, आरोप-प्रत्यारोप करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. औरंगाबादेतील ८० टक्के महिलांचा भावनिक व्यवस्थापनाचा बुद्ध्यांक (इमोशनल मॅनेजमेंट कोशंट) घसरत असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. 

भारतीय समाजात पूर्वापारपासून कुटुंबाची सारी जबाबदारी महिलांवरच होती. शेतांवर राबणे, धुणी, भांडी, मुलांना सांभाळणे, नातेवाइकांसोबत हितसंबंध जपणे अशी कामे त्या लीलया करत. १९६० नंतर मोठ्या प्रमाणावर महिला नोकरी, व्यवसायासाठी घराबाहेर पडल्या. तेव्हाही त्या कुटुंब आणि नोकरी सांभाळण्यात वाकबगार असल्याचे समोर आले. त्यांना भावनिक व्यवस्थापनाची निसर्गानेच देणगी दिल्याचे सांगितले जात होते. परंतु, आता परिस्थिती बदलत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. डाॅ. अपर्णा अष्टपुत्रे-सिसोदे शहरातील महिलांच्या भावनिक व्यवस्थापन म्हणजेच इमोशन मॅनेजमेंटवर अभ्यास करत आहेत. आतापर्यंत व्याख्यानांद्वारे त्यांनी दोन हजारांपेक्षा अधिक महिलांशी संवाद साधला आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या नोंदी केल्या आहेत. त्यावरून गेल्या १० वर्षांत ८० टक्के महिलांचे इमोशनल मॅनेजमेंट बिघडल्याचे त्यांचा निष्कर्ष आहे. ‘दिव्य मराठी’शी बोलताना डॉ. अष्टपुत्रे त्यांनी हे व्यवस्थापन बिघडण्याची कारणे सांगितली. ती अशी. 

घसरलेला भावनिक व्यवस्थापन बुद्ध्यांक वाढवण्यासाठी डॉ. अष्टपुत्रे पुढील उपाय सांगतात. सुपर वुमन होण्याचा हट्ट सोडला पाहिजे. मला सर्वकाही जमते. सर्वकाही मीच केले पाहिजे, असा आग्रह सोडून प्रत्येक कामासाठी पर्यायी व्यवस्था तयार केली पाहिजे. जे आहे ते खुल्या मनाने स्वीकारा. जे घडतंय ते मान्य करा. एखादी घटना मनाविरुद्ध घडतेय, ती आपण रोखू शकत नाही, हे मान्य करा. म्हणजे मनावरील ७० टक्के दडपण कमी होते. स्वत:शी संवाद साधल्यामुळे आपल्यातील गुणदोष लक्षात येतात. अशा संवादामुळे मनावरील ताण घटताे. स्वत:चा आदर केल्यामुळे प्रत्येक माणूस वेगळा असल्याचे लक्षात येते. त्यात बदल घडवण्याऐवजी तो आहे तसा स्वीकारला तर मनावरील ताण कमी होतो. 

असे करा भावनिक व्यवस्थापन 
-  वंध्यत्व, हार्माेन्सचा बदल, गर्भातच बाळाचा मृत्यू किंवा जन्माला येणाऱ्या बाळाची रोगप्रतिकारशक्ती कमी असणे. 
-  कधी कधी ही प्रतिक्रिया हिंसकही होत आहे, रागावणे, भांडणे, सहकाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. 
-  चिडचिडेपणा वाढला, कोणत्याही कृतीवर प्रतिक्रिया देण्याचे प्रमाण वाढले. 

काय होतोय परिणाम 
-  सुपर वुमन होण्याची भावना. 
- ऑफिसमध्ये अधिक काम करून उरलेले घरी घेऊन येणे. 
- रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटे लवकर उठून कार्यालयाचे काम करणे 
- मुलांकडे दुर्लक्ष असल्याचा सल निर्माण होणे. 
- सल भरून काढण्यासाठी मुलांकरिता जंक फूड आणणे. त्यांना खर्चासाठी मोठी रक्कम देणे. 
- जंक फूड, खर्चासाठी रक्कम देणे योग्य की अयोग्य यावरून मनात द्वंद्व निर्माण होणे. 
- कष्ट, त्याग करूनही घरात कौतुक होत नसल्याची भावना बळावणे. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...