आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणमध्ये ३००० भाविकांचे शाही स्नान, एकनाथ-भानुदास नामाचा गजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- पैठणनगरीत तीन हजारांवर साधू-महंतांसह भाविकांनी सिंहस्थ कुंभमेळ्यातील तिसऱ्या पर्वणीचे शाही स्नान शुक्रवारी केले. या वेळी गोदाकाठी शाही स्नानासाठी गर्दी झाली. सुमारे ४१६ वर्षांपूर्वी संत एकनाथांनी १२ वाजेच्या सुमारास समाधी घेतली होती. त्याच वेळेच्या मुहूर्तावर पैठण येथे संत एकनाथांचा जयघोष करत शाही स्नानास सुरुवात झाली.

गोदातीरी पुरोहित कमलाकर शिवपुरी, उत्तम शेवणकर, अनंत खरे, रवींद्र साळजोशी यांच्या मंत्रोच्चारात शाही स्नानास प्रारंभ झाला. पहिल्या शाही स्नानाप्रमाणेच तिसऱ्या शाही स्नानाला महत्त्व असल्याचे या वेळी संतमंडळींनी सांगितले. तिन्ही शाही स्नानांना शुद्ध पाणी मिळाले. नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी विशेष लक्ष दिले. कुंभमेळा समितीचे केशव महाराज चावरे, बळीराम औटे, बबन चौरे, सदानंद महाराज मगर आदी उपस्थित होते.
इथे झाले शाही स्नान
नागघाट, रंगारहट्टी, नाथघाट, देवघाट, अमृतराय घाट, गायबा घाट, पिंपळेश्वर घाट या ठिकाणी शाही स्नान झाले. येथे अनुराधा दीदी पंढरपूरकर, दुर्गाताई पोकळे, अनुसया सोनवणे, विजया महाराज बनसोडे, बाजीराव महाराज जलळेकर, प्रफुल्लबुवा तळेगावकर, सुनील रासणे, अप्पासाहेब गायकवाड, दिलीप मगर, पंढरीनाथ फुलझळके, कांता शिवपुरी, शंकर सपकाळ, आबा बरकसे, अनिल सराफ, विनोद लोहिया, संगीता खंडागळे यांच्यासह सांधू-महंतांनी शाही स्नान केले.
शासनाने सुविधा द्याव्यात
नाशिक कुंभमेळ्याच्या धर्तीवर पैठणचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता येथे विविध सुविधा शासनाने पुरवाव्यात, अशी मागणी केशव महाराज चावरे, दिनेश पारीख, रवींद्र तांबे आदींनी केली.