आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामी शांतीगिरी महाराजांना समाजरत्न पुरस्कार घोषित, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ- निष्काम कर्मयोगी जगद््गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदान व उचित कार्याबद्दल बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. 

पत्रकार दिनानिमित्त परिसंवाद व राज्यस्तरीय विविध क्षेत्रांतील गुणवंतांना समाजरत्न पुरस्कार प्रदान  कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (८ जानेवारी) सकाळी ११ वाजता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (गोवेली, ता. कल्याण, जि. ठाणे) येथे बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये शैक्षणिक क्षेत्र स्वामी शांतीगिरी महाराज (वेरूळ, औरंगाबाद), पत्रकारिता योगेश त्रिवेदी (प्रिंट मीडिया), रणधीर कांबळे व तुळशीदास भोईटे (इलेक्ट्रॉनिक मीडिया), सामाजिक कार्य ओमप्रकाश शर्मा (पालघर), उद्योजक क्षेत्र सुरेश कोते (अहमदनगर), कल्पनाताई सरोज (ठाणे), कला क्षेत्र गीता माळी (नाशिक), राजकीय क्षेत्र किसनराव कथोरे (ठाणे), वैद्यकीय क्षेत्र डॉ. महादेव पांडुरंग मोरे (नातेपुते, सोलापूर), क्रीडा क्षेत्र  श्रद्धा घुले (अहमदनगर), प्रशासकीय क्षेत्र अभिजित बांगर (पालघर, जिल्हाधिकारी), साहित्य क्षेत्र श्रीपाल सबनीस (मुंबई)  यांचा समावेश आहे.  याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, देवेंद्र भुजबळ, एकनाथजी शिंदे, रवींद्र चव्हाण, कपिल पाटील, किसनराव कथोरे, पांडुरंग बरोरा, पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष रवींद्र घोडविंदे, राज्य सचिव नरेंद्र पाटील, राज्य उपाध्यक्ष भगवान जाधव, अशोक पाटील, सुनील गीते, महेंद्र देशपांडे, कार्याध्यक्ष अनिल घोडविंदे,  दीपक हिरे, सुरेश सापले, विजय गायकवाड,  मंगेश बनकरी, दिलीप पाटील उपस्थित राहतील. जय बाबाजी भक्त परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन  वैभव किरगत यांनी केले.
 
बातम्या आणखी आहेत...