आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बारा बलुतेदारांना सोबत घेऊन सर्वांच्या हितासाठी लढतो मराठा.. ‘शिवराय नव्हते मुस्लिमविराेधी ’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 औरंगाबाद - ‘दिव्य मराठी’ ब्रँडिंगच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘लढवय्यांची बखर’ या पुस्तकाचे प्रकाशन कदम यांच्या हस्ते सोमवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. मंचावर मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, ज्येष्ठ   साहित्यिक रा. रं. बोराडे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. दादा गोेरे, “दिव्य मराठी’चे सीओओ निशित जैन यांची उपस्थिती होती. 
 
मराठा ही एक जात नव्हे, तर बारा बलुतेदारांना सोबत घेऊन सर्वांच्या हितासाठी लढतो तो मराठा होय असे सांगत राज्याचे पर्यावरणमंत्री, औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम म्हणाले, की शिवाजी महाराजांचे नाव समोर आले की त्यांनी केलेल्या लढाया डोळ्यासमोर येतात. परंतु मराठा म्हणजे लढवय्या, मर्दासारखा अशी वस्तुस्थिती आहे. केवळ मराठ्याच्या पोटी आला म्हणून तो मराठा होत नाही.  महाराजांच्या सैन्यात १८ पगड जाती-जमातींचे सैनिक होते. तोफखाना सांभाळणारे मुस्लिम होते. त्यांचे वकीलही मुस्लिमच होते.   
 
कदम म्हणाले, ‘जर शिवाजी महाराज लढवय्ये नसते तर आमचे काय हाल झाले असते? शिवरायांनी  जिजाऊंच्या पोटी जन्म घेतला नसता तर काय झाले असते याचा विचार करवत नाही. आता शिवाजी महाराज म्हटले की लढवय्या म्हणून अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात. संभाजी महाराज औरंगजेबासमोर झुकले नाहीत. औरंगजेबाने त्यांचे डोळे काढले, नखे काढली, हातपाय तोडले; पण संभाजीराजे शेवटपर्यंत लढत राहिले. म्हणून शेवटपर्यंत शरण येत नाही तो लढवय्या आणि मराठा आहे. “दिव्य मराठी’ने ‘लढवय्यांची बखर’ हे पुस्तक काढून एक स्तुत्य उपक्रम केला आहे,’ असेही ते म्हणाले.   
 
‘शिवराय मुस्लिमविराेधी नव्हते’  
- रा.रं. बोराडे म्हणाले की, ‘मराठा क्रांती मोर्चाचा इतिहास भावी पिढीसाठी पुस्तकरूपात लिहून ठेवला गेला पाहिजे.’   

- बाबा भांड म्हणाले की, ‘मराठ्यांच्या बहादुरीचे पोवाडे गाण्याची वेळ केव्हाच गेली आहे. आता प्रामाणिकपणे जनकल्याणाचे हित समाजाने जोपासले पाहिजे.’  ज्येष्ठ समीक्षक डॉ. दादा गोरे म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे जातीयवादी किंवा मुस्लिमविरोधी नव्हते. ते परकीयांच्या विरोधात लढत होते, त्यामुळेच ते पुढे जाऊ शकले. त्यांनी फक्त मराठा-मराठा केले असते तर ते राज्य निर्माण करू शकले नसते.’
बातम्या आणखी आहेत...