औरंगाबाद - अवघ्या महाराष्ट्राचेच दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यभरात साजरी केली जात आहे. तारखेनुसार साजरी होणारी ही शिवजयंती असून सगळीकडे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत असल्याचे चित्र आहे. इंटरनेटच्या आजच्या युगात, नेटिझन्सनेही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. शिवरायांचे विविध प्रकारचे फोटो, अॅनिमेशन, मॅसेजेस यांच्या माध्यमातून इंटरनेटवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. व्हाट्सअॅप, ट्वीटर, फेसबूक अशा विविध माध्यमातून या महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहे. या पॅकेजच्या माध्यमातून आपण आज इंटरनेटवर साजरा झालेल्या या शिवजयंतीचे दर्शन घेणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावर शेअर झालेल्या शिवजयंतीच्या Posts
(संबंधित पोस्ट या ट्वीटर फेसबूकवरून घेतलेले स्क्रीनशॉट्स आहेत.)
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)