आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेला श्रेय जाऊ नये म्हणून ‘पीएमसी’ला विरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -शहरातील ४२ रस्ते तयार करण्यासाठी शासनाकडून १५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्याचा आराखडा तयार करण्यासाठी पीएमसी (सल्लागार समिती) आवश्यक आहे. मात्र, सेनेला श्रेय मिळू नये, यासाठी भाजपच्या वतीने पीएमसी नेमण्यास विरोध करण्यात आला आहे. यात भाजपचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी केला. त्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडूनच निधी आणण्यासाठी पुढाकार घेण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण स्थायी समिती सदस्य राज वानखेडे यांनी दिले.
गुरुवारी पार पडलेल्या स्थायी समितीत शहरातील रस्ते करण्यासाठी शासनाकडून १५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी डीपीआर (समग्र विकास आराखडा) तयार करणे आवश्यक आहे. त्यानंतरच शासनाकडून निधी देण्यात येणार आहे. डीपीआर तयार करण्यासाठी स्वतंत्र सल्लागार समिती नियुक्ती करणे आवश्यक असल्याने प्रशासाकडून हा ठराव स्थायी समितीत ठेवण्यात आला होता. त्याला भाजपच्या नगरसेवकांनी सर्वाधिक विरोध केला होता. त्यानंतर एमआयएमसह कैलास गायकवाड यांनीही विरोधक केला होता. त्यानंतर हा ठराव रद्द करण्यात आल्याचे सभापती मोहन मेघावाले यांनी स्पष्ट केले. त्यावर शुक्रवारी सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी भाजपच्या या विरोधावर शंका उपस्थित केली. तसेच पीएमसीला विरोध म्हणजेच थेट विकासाला विरोध असल्याचेही त्यांनी सांगितले. हे रस्ते पर्यटनस्थळांना जोडणारे असल्याने त्याचा फायदा पर्यटकांनाही झाला असता. मात्र, हा ठराव रद्द करण्यात आल्याने शहरातील नागरिकांचेही भाजपने नुकसान केल्याचे जंजाळ म्हणाले. यावर बोलताना स्थायी समिती सदस्य राज वानखेडे यांनी सेनेने केलेले आरोप चुकीचे असून आम्ही मनपाचे होणारे नुकसान थांबवल्याचे सांगितले. तसेच एक कोटी ८० लाख रुपये पीएमसीला देण्याऐवजी अभियांत्रिकी महाविद्यालय, सिडको अथवा निवृत्त अभियंत्याकडून काम करून घेतल्यास ५० लाख रुपयांपर्यंत डीपीआर तयार होऊ शकतो. आमचा १५० कोटींच्या विकासकामाला विरोध नसून केवळ पीएमसीला विरोध असल्याचे सांगितले.

वॉर्डातील रस्ते नाहीत
^हे रस्ते शिवसेनेच्या वॉर्डातील असतील तर भाजपने विरोध करणे अपेक्षित होते. मात्र, हा शहराचा विषय होता. मनपाकडे तांत्रिक आणि पुरेसे मनुष्यबळ नसल्याने पीएमसी नेमणे
आवश्यक होते. मात्र, भाजपमुळे हा विकास थांबला. -राजेंद्रजंजाळ, सभागृह नेते, शिवसेना.

आमचा खर्चाला विरोध
^आमचा विकासाला विरोध नसून केवळ विकासाच्या नावाखाली पीएमसीवर होणाऱ्या खर्चाला विरोध आहे. ५० लाख रुपयांत हे काम होऊ शकते. त्यासाठी मनपा आयुक्त तयार असून अभियांत्रिकी महाविलयाकडून हा आराखडा तयार करून घेण्यात येणार आहे. -राज वानखेडे, भाजप स्थायी समिती सदस्य
बातम्या आणखी आहेत...