आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेत नवख्यांपाठोपाठ ज्येष्ठांच्याही नाराजीचा भडका, बंडाचा झेंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेनेतनाराजीचे पेव आणखी वाढू लागले आहे. अपक्ष नगरसेवकाला उपमहापौरपदाची संधी दिल्याने नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करतानाच १२ जणांचा वेगळा गट निर्माण करण्याचे संकेत दिले असतानाच पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांनीही बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. पक्षात धनदांडग्यांनाच स्थान देण्यात येत असल्याचा आरोप करत भविष्यात स्थानिक नेत्यांना जेरीस आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
ज्येष्ठ नगरसेवक राजू वैद्य, नंदकुमार घोडेले आणि माजी महापौर विकास जैन यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. दुसरीकडे नव्या दमाचे राजेंद्र जंजाळ त्यांच्या ११ सहकाऱ्यांनीही या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचे धाडस दाखवले. त्यामुळे येत्या काही दिवसांत सेनेतील नाराजी पर्व वेगवेगळे वळण घेण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेत इतक्या मोठ्या प्रमाणावर नाराजी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नवखे आणि ज्येष्ठ अशा दोन आघाड्या स्थानिक नेत्यांसमोर उभ्या ठाकल्या आहेत.

उपमहापौरपदासाठी स्मिता घोगरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची होती तर आम्ही नव्हतो का असे म्हणत नव्यानेच निवडून आलेले १२ नगरसेवक संतप्त झाले. त्यांनी स्थानिक नेत्यांची भेट घेतली.
सभागृहनेतेपदी गजानन मनगटे तर गटनेतेपदी मकरंद कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना पूर्वीच स्थायी समितीचे सदस्यपद देण्यात आले होते. तरीही त्यांना दुसरी पदे देण्यात आली. त्यामुळे नवखी मंडळी संतप्त असतानाच त्यात ज्येष्ठांचीही भर पडली. केवळ धनाढ्यांनाच संधी मिळते, अशी सर्वांची तक्रार आहे.

गांभीर्याने विचार करू
-एकच पद असते त्यामुळे काही जण नाराज होतातच. परंतु येथे आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप होताहेत. पैसे घेऊन पद दिले असेल तर ते गंभीर आहे. यावर आम्ही गांभीर्याने विचार करू. मी हा प्रकार नेत्यांच्या कानी घालणार आहे. उद्धवजी त्यावर निर्णय घेतील.
-विनोद घोसाळकर, संपर्कप्रमुख.

पुढे काय होऊ शकते?
वैयक्तिक स्वार्थासाठी पदे दिल्याची खात्री ठाकरे यांना पटली तर सभागृह तसेच गटनेतेपदाचे उमेदवार बदलले जाऊ शकतात. उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून अन्य कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यात बदल होणार नाही. परंतु सभागृहनेतेपद बदलले जाऊ शकेल.

सोमवारी मातोश्रीवर
नाराज १८ नगरसेवकांतील ज्येष्ठ नगरसेवक सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. त्यानंतर नव्या दमाचे नगरसेवक आपली व्यथा मांडतील. या नगरसेवकांना मातोश्रीवर वेळ मिळू नये, यासाठी शिरसाट आणि दानवे यांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
नेत्यांकडे ज्येष्ठांचे सवाल
घोगरे यांचे पक्षात योगदान काय आहे?
एक व्यक्ती एक पद धोरणाचे काय झाले?
खासदार किंवा आमदारकीसाठी तेच ते चेहरे कशासाठी?
मुलगा, पुतण्यालाच का नगरसेवक केले?
नातेवाइकांनाच का पक्षातील पदे दिली जातात?
कोणावर आहे नाराजी? खासदारचंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट जिल्हाप्रमुख अंबादास दानवे या तिघांनी मिळून नवख्यांना संधी देण्याच्या नावाखाली घोगरे यांची उमेदवारी निश्चित केली. त्यांच्यासाठीच मनगटे आणि कुलकर्णी यांनाही पदे दिली. निष्ठावानांना मुद्दाम डावलण्याचे धोरण त्यांनी अंगीकारले. नवखेच हवे असेल तर पुढील वेळी खैरे, शिरसाट यांना उमेदवारी देऊ नका दानवे यांच्या जागेवरही नवा जिल्हाप्रमुख द्या, अशी थेट मागणी केली.
अधिवेशनसोडून आमदार येथे कसे? आमदारशिरसाट हे शहरात थांबत नाहीत, कायम मुंबईतच असतात, अशी टीका नेहमी त्यांच्यावर होते. परंतु घोगरे यांच्या उमेदवारीच्या घोषणेसाठी ते हिवाळी अधिवेशन सोडून शहरात आले. सेनेत कधीच पत्रकार परिषद घेऊन उमेदवाराची घोषणा झालेली नाही. येथे मात्र संपर्कप्रमुख घोसाळकर यांना तातडीने शहरात बोलावले अन् पत्रकार परिषदेत घोषणा केली. या वेळी आमदार अधिवेशन सोडून येथे कसे, असा सवाल शिवसैनिकांनी केला आहे.

सावलीगायब : घोडेलेहे कायम खैरे यांच्या समवेतच राहत असल्याने त्यांना खैरेंची सावली संबोधले जाते. परंतु निष्ठावानांना डावलण्यात आल्याने खैरेंची सावली गायब झाली. शुक्रवारी सायंकाळी खैरे दिल्लीहून परतले तेव्हा घोडेले त्यांच्या समवेत नव्हते. खैरे कायम सोयीचे राजकारण करतात. आताही केवळ धनशक्तीमुळेच त्यांनी घोगरे यांची तळी उचलल्याने घोडेले यांनी कधी नव्हे तर राजकीय सूज्ञपणा दाखवल्याचे बोलले जाते.
बातम्या आणखी आहेत...