आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादः सुसाईड नोटमध्ये लिहिले गार्डन-विहीर, उघड्या हौदात दुकानदाराने मारली उडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आयुष्याला कंटाळलो असून इच्छामरण स्वीकारत असल्याचे एका कागदावर लिहून पन्नासवर्षीय दुकानदाराने परिसरातीलच उघड्या हौदात आत्महत्या केली. सुनील पंडित सोनार (५०, रा. दीपनगर, एन-११) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी सात वाजता हा प्रकार घडला. सिडको पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. 
 
सुनील गुरुवारी सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले. त्यानंतर बराच वेळ ते आलेच नाहीत. घरातील सदस्यांना फ्रिजवर एक चिठ्ठी दिसली. ती वाचून त्यांचा शोध सुरू झाला. त्यांनी सोबत नेलेल्या मोबाइलवर घरच्यांनी अनेक वेळा कॉल केले. प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचा संशय बळावला. दरम्यान, जैन मंदिराच्या परिसरातील पाण्याच्या हौदाबाहेर त्यांच्या चपला मोबाइल आढळून आला. सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुनील यांचा मृतदेह हौदाबाहेर काढून घाटीत पाठवण्यात आला. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. ते काही वर्षांपासून आजारी होते. त्यांचे जनरल स्टोअर्स आहे, असे जमादार डी. एच. राठोड व्ही. एन. बिरारे यांनी सांगितले. 

सुसाइड नोटमध्ये लिहिले ‘गार्डन, विहीर’ 
दीपनगरमध्ये महानगरपालिकेचे उद्यान असून तेथेच एक विहीर आहे. सोनार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोटमध्ये माझ्या मरणास कुणीही जबाबदार नाही असा उल्लेख करत गार्डन, विहीर असे शब्द लिहून ठेवले होते. सुरुवातीला या उल्लेखामुळे घरच्यांनी तत्काळ विहिरीकडे धाव घेतली, परंतु विहिरीत काहीही आढळून आले नाही. विहिरीपासून काही अंतरावरच मात्र ट्रॅव्हल्स बस वाॅशिंग सेंटर आहे. त्यामधील हौदाचे झाकण उघडे होते, त्यात त्यांनी उडी मारली, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून मुलगी आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...