आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल इस्टेट, वाहन बाजारात तेजी; सोने-चांदीलाही चकाकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वाहनांची खरेदी-विक्री, सोन्याची मागणी आणि रिअल इस्टेटमध्ये होणारी गुंतवणूक यावरून शहराची समृद्धीकडे वाटचाल होत असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन वर्षांतली उलाढाल पाहता यावर्षी औरंगाबाद शहराच्या श्रीमंतीत वाढ झाली, असे दिवाळीनिमित्त झालेल्या आर्थिक उलाढालींवरून लक्षात येते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजारपेठेत साधारणत: २५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली असून विशेषत: रिअल इस्टेट क्षेत्रात तेजीला सुरुवात झाली असल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

शहराची श्रीमंती आयकर आणि विक्री कराच्या माध्यमातून कळते. त्याशिवाय शहरात होणारी सोने खरेदी, वाहन विक्री आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणूक व्यवहारातूनही ती जाणवते, असे मत सीए उमेश शर्मा यांनी व्यक्त केले. तर सीए रेणुका देशपांडे म्हणाल्या की, सोने, वाहन खरेदी, रिअल इस्टेटच्या माध्यमातून शहराची श्रीमंती कळते. मात्र शहराच्या श्रीमंतीसाठी पायाभूत सुविधाही चांगल्या असायला हव्यात. तरच त्याचा फायदा सर्वसामान्यांना आणि श्रीमंती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.


वाहनक्षेत्रात सर्वाधिक तेजी : गेल्यातीन वर्षांच्या तुलनेत वाहन क्षेत्रात या वर्षी उलाढाल मोठ्या प्रमाणात झाली आहे. दसरा ते दिवाळी दरम्यान २२०० ते अडीच हजारापर्यंत चार चाकी गाड्यांची विक्री झाली. शहरात १३ वेगवेगळ्या मोठ्या कंपनीच्या चारचाकी वाहन उपलब्ध आहेत. ज्यामध्ये पाच लाखांपासून ते ४० लाख रुपयांपर्यंतच्या गाड्यांची विक्री केली जाते. दसरा ते दिवाळी दरम्यान १२ हजारांपर्यंत दुचाकीची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी चार चाकींची दीड हजार तर २०१४ मध्ये १००० पर्यंत िवक्री झाली होती. गेल्या वर्षी दुचाकींची विक्री हजारांपेक्षाही कमी होती. रेनॉल्टचे जनरल मॅनेजर बालाजी तळेकर यांनी सांगितले की यावर्षी बाजारात वाहनविक्रीत वाढ जाली असून या वर्षी आतापर्यंत रेनोच्या १४५ गाड्यांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या केवळ ७० इतकी होती.


रिअल इस्टेट क्षेत्रात या वर्षी सुधारणा
दुष्काळाचा फटका रिअल इस्टेटला मोठ्या प्रमाणात बसला होता. मात्र या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे बाजारात सुधारणा होत आहे. दसऱ्यांनतर दररोज १५ ते २५ प्लॉट आणि फ्लॅटची विक्री होत आहे. गेल्या दोन वर्षात हे चित्र केवळ पाच ते दहा इतके होते. आगामी काळात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


सराफा बाजारात १५० ते २०० कोटींची उलाढाल
शहरात जवळपास १५० छोटे मोठी सराफा दुकाने आहेत. महिनाभरात साधारण १५० ते २०० कोटींपर्यंत उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षी ही स्थिती ११० ते १२० कोटी तर २०१४ मध्ये १०० कोटींच्या दरम्यान होती. त्यामुळे सोनेखरेदीत २५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढल्याची माहिती म. रा. सराफा महामडंळाचे उपाध्यक्ष अशोक वारेगावकर यांनी दिली.


^गेल्या दोनतीन वर्षांत रिअल इस्टेटमध्ये फारशी तेजी नव्हती. मात्र या वर्षी मराठवाड्यात पाऊस चांगला झाल्यामुळे व्यवहार वाढले आहेत. दसऱ्यापासून १५ ते २५ घरांची आणि प्लॅटची दररोज विक्री होत आहे. येत्या काळात आणखी वाढ होणार आहे. राहुल झांबड, बांधकाम

व्यावसायिक
^दसरा तेदिवाळी दरम्यान २२०० ते अडीच हजारांपर्यंत चार चाकी गाड्याची विक्री करण्यात आली आहे. तर दुचाकी गाड्यांची विक्री १२ हजारांवर गेली आहे. चांगले पाऊसमान, सातवा वेतन आयोग तसेच कर्जाची सुलभता तसेच कंपन्यांनी वाहन खरेदीत दिलेली सूट यामुळे ही विक्री वाढली आहे. विकासवाळवेकर, सेल्स हेड, ह्युंदाई


बातम्या आणखी आहेत...