आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला बोलूया...नैराश्य टाळूया...एक दिवस वृद्धाश्रमात..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- श्रयम् फाउंडेशन औरंगाबाद यांच्या तर्फे मातोश्री वृद्धाश्रम कांचनवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करुन जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.
 
 "चला बोलुया नैराश्य टाळूया..!" या आशयानुसार उपक्रमांतर्गत् श्रयम् तर्फे वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत मनमोकळ्या गप्पा तसेच काही खेळ घेऊन नैराश्य दूर करण्याचा आदर्श प्रयत्न करण्यात आला. त्याच बरोबर त्यांच्या जीवनाबद्दल माहिती जाणून घेऊन त्यांना आनंदी राहण्यासाठी समुपदेशन करण्यात आले.
 
तसेच यावेळी श्रयम् सदस्य मित्र श्री.अविश वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील व्यवस्थापक श्री.सागर पागोरे व वृद्ध प्रतिनिधी श्री.ऍड.ललित जोशी यांच्याकडे दोन सीलिंग फॅन व दोन ट्यूब लाइट सेट देऊन अनोखी मदत करण्यात आली.
 
या उपक्रमासाठी श्रयम् चे शुभम् हरणे ,श्रेया वर्के, आशिष इंगळे, माधुरी भुरेवार, गायत्री मराठे ,अविश वानखेडे, अमनप्रतापसिंग, अजित चौहान, आशिष जावळे, उदय तावरे,निकिता दास, गौरव कोंदलकर, सूरज तावरे, व अविश वानखेडे मित्र मंडळ आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रयम् सचिव शुभम् हरणे यांनी केले तर अध्यक्षा श्रेया वर्के यांनी आभार व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...