आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर श्रुती भागवत खून प्रकरणाच्या तपासाची सूत्रे सीआयडीकडे, ती नोकर महिला अजूनही बेपत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पाच वर्षांपूर्वीपासून गूढ असलेल्या श्रुती भागवत खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा. सीआयडीच्या औरंगाबाद पोलिस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली सहा महिन्यांत तपास पूर्ण करून १० ऑक्टोबर २०१७ पूर्वी अहवाल सादर करावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी दिले. तपासासंबंधी गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक पुणे यांनी सातत्याने लक्ष ठेवावे, असेही आदेश आहेत. 

श्रुती यांचा १७ एप्रिल २०१२ मध्ये उल्कानगरीतील श्रीनाथ अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये खून झाला होता. श्रुती यांचा भाऊ मुकुल करंदीकर यांनी तपास स्थानिक पोलिसांना वगळून अन्य तपास यंत्रणेकडे द्यावा, अशी विनंती करणारी याचिका अॅड. अभयसिंह भोसले यांच्यामार्फत दाखल केली होती. 

घटनास्थळी सापडलेल्या टेलरच्या पावतीवरून शिलाई केलेला ड्रेस पोलिसांचा असण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र पोलिसांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असे त्यांचे म्हणणे आहे. शासनातर्फे अॅड. एस. बी. यावलकर यांनी काम पाहिले. 

ती नोकर महिला खून झाल्यापासून बेपत्ता 
श्रुती यांच्याकडे कामाला असलेली नोकर महिला घटनेच्या दिवशीपासून आजपर्यंत बेपत्ता आहे. तिचा शोध घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केलेला नाही, असे याचिकेत म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...