आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोमवारी, मंगळवारी पर्यटकांना बघायला मिळतील ‘सिद्धार्थ’मधील वाघाचे बछडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपाच्या प्राणिसंग्रहालयातील समृद्धी नावाच्या पिवळ्या वाघिणीने पंधरा दिवसांपूर्वी चार बछड्यांना जन्म दिला होता. त्यापैकी एक बछडे लगेचच दगावले. उर्वरित तीन बछड्यांनी मंगळवारी डोळे उघडले होते. त्यांची प्रकृती चांगली असल्याने सोमवारी मंगळवारी या पिल्लांना आईसोबत बाहेर ठेवण्यात येणार असल्याने पर्यटकांना हे बछडे बागडताना दिसणार आहेत.
पिवळ्या वाघांचा विस्तार : काहीवर्षांपूर्वी पंजाब येथील चतबीर प्राणिसंग्रहालयातून पिवळ्या वाघांचे चार बछडे आणण्यात आले होते. त्यातील दीप्ती गुड्डू या जोडीने सहा वर्षांपूर्वी नर-मादी अशा दोन बछड्यांना जन्म दिला होता. त्यातील समृद्धी आहे. तिने या तिन्ही पिलांना जन्म दिला आहे. यात दोन बछडे पिवळे, तर एक पांढऱ्या रंगाचा वाघ आहे. काही महिन्यांपूर्वी प्राणिसंग्रहालयात चंद्रपूर येथून आणलेल्या बिबट्याच्या चार नवजात पिलांचा मृत्यू झाला. योग्य काळजी घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्या वेळी सदस्यांकडून करण्यात आला. याप्रकरणी प्राणिसंग्रहालय संचालक बी. एस. नाईकवाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे या नवजात बछड्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. पिलांना जंतुसंसर्ग होणार नाही यासाठी वाघिणीच्या पिंजऱ्यात केअर टेकरव्यतिरिक्त आतापर्यंत इतर कोणालाही प्रवेश देण्यात आलेला नाही.
तसेच कुणालाही त्यांचे फोटो काढू दिले नाहीत. बछड्यांच्या जन्मानंतर सर्वांनाच बछडे पाहण्याची उत्सुकता लागली होती. मात्र दोन-तीन दिवसांनंतर हे बछडे पर्यटकांसाठी बाहेर ठेवण्यात येणार असल्याने बघण्याची प्रतीक्षा संपणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...