आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठण: बिडकिन येथे गायक सोनू निगमच्या फोटोला आंदोलकांनी मारले जोडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- ‘अजानमुळे माझी झोपमोड होते’, असे टि्वट करून गायक सोनू निगम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तालुक्यातील बिडकिन येथे सोनू निगमच्या फोटोला 'जोडे मारो' आंदोलन करण्‍यात आले.

सोनू निगय यांनी अजानविषयी अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याचा निषेध म्हणून सोनू निगम यांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन करण्‍यात आल्याचे सद्दाम रफियोद्दीन ईनामदार यांनी सांगितले.

बिडकिन बसस्थानकासमोर आज (सोमवारी) 11 वाजता सोनू निगम यांच्या फोटोला जोडे मारून जाहीर निषेध करण्‍यात आला. नंतर निवेदन पोलिस निरीक्षकांना देण्यात आले.

दुसरीकडे, सोनूने अजानचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सोनूने रविवारी दोन मिनिटांची क्लिप पोस्ट करून त्यावर ‘गुडमॉर्निंग इंडिया’ असे लिहिले आहे. 17 एप्रिल रोजी सोनूने अजानमुळे माझी झोपमोड होत असल्याचे टि्वट केले होते. त्यानंतर त्याच्यावर प्रचंड टीका झाली. कोलकाता येथील इमाम सय्यद शहा अतेफ अली अल कादरी यांनी सोनूचे टक्कल करणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यानंतर सोनूने पत्रकार परिषद घेत टक्कल करून घेतले होते.

पुढील स्लाईडवर पाहा... सोनू निगम याने पोस्ट केलेला अजानचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...