आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन टक्के लोक बदलून घेताहेत गावाच्या नावावरून आडनाव!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जातनिदर्शक आडनावांवर बंदी घालण्यासाठी खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी खासगी विधेयक आणणार असल्याचे सांगितले. आडनावावरून जात कळू नये यासाठी गावानुसार आडनाव असले पाहिजे, अशी मागणी त्यात केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील स्थितीची माहिती घेतली असता दोन टक्के लोक गावाच्या नावावरून आडनाव बदलून घेत असल्याचे समोर आले आहे.
दरवर्षी शहरातील सुमारे अडीच ते तीन हजार लोक नावात बदल करतात. यात विवाहानंतर आडनाव किंवा नाव बदलल्याने ही प्रक्रिया करण्यात महिला आघाडीवर आहेत. राज्यातही वर्षभरात सुमारे सव्वा लाख लोकांनी नावात बदल केले. औरंगाबादसह राज्यातील प्रत्येक महसूल विभागात शासकीय लेखनसामग्री ग्रंथागार विभाग आहे. औरंगाबादेत रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली हे कार्यालय आहे. येथून आठ जिल्ह्यांचे काम चालते. गणेश बचाटे हे येथे सहायक संचालक, तर दौलत गडवे पर्यवेक्षकपदी कार्यरत आहेत. गडवे म्हणाले, विवाहानंतर महिलांचे आडनाव तर बदलतेच, पण अनेक महिलांची नावे बदलण्याचीही पद्धत आहे. काही नावामागे मोठे वलय असते, तर काही अाडनावे लाजिरवाणी वाटतात. ज्याेतिषशास्त्र, अंकशास्त्र यानुसारही नावात बदल करण्याचा सल्ला दिला जातो. याचाच परिणाम म्हणून शहरासह राज्यभर नावात बदल करण्याचे प्रमाण वाढले आहे. नोकरी, पासपोर्ट आणि अन्य सरकारी कामकाजासाठी नाव बदलले जाते.

{ अनेकदाघरात घेतले जाणारे नाव कागदपत्रांवर नोंदवले जाते.
{बाळाच्याजन्मानंतर माहेरकडील मंडळी एक नाव ठेवतात, तर सासरकडील दुसरे.
{ दवाखान्यातएक नाव ठेवले जाते; पण पत्रिकेतील जन्माक्षर वेगळे निघते.
{काना, मात्रांमध्ये चुका असतात. अशा प्रकरणात दुरुस्ती करणाऱ्यांची संख्याच अधिक.
{ नावासहधर्म आणि जन्मतारखेतील दुरुस्तीही येथे करता येते.
{औरंगाबादच्या कार्यालयात नाव बदलाची नोंद अशी

असे बदलता येते नाव
{पूर्वी नाव बदलण्याची प्रक्रिया मॅन्युअली केली जायची. फेब्रुवारी २०१५ पासून ती ऑनलाइन करण्यात आली आहे. यामुळे पैसा, वेळ आणि श्रमाची बचत होत आहे.
{ महाराष्ट्र शासनाची www.maharashtra.gov.in या वेबसाइटवरून किंवा थेट www.dgps.maharashtra.gov.in वेबसाइट उघडा
{ येथे डाव्या बाजूला ऑनलाइन सेवा हे ऑप्शन दिसते. त्या ठिकाणी नाव, धर्म आणि जन्मतारीख बदलणे ही ऑप्शन्स दिसतात. नाव बदलण्यासाठी पहिले ऑप्शन क्लिक करावे.
{ येथे लॉगइन करून वन टाइम पासवर्ड मिळतो. तो टाकून आवश्यक माहिती भरावी.
{ पत्ता आणि वय दर्शवण्यासाठी निवडणूक ओळखपत्र, वाहन परवाना, आधार कार्ड, पासपोर्ट यापैकी एक पुरावा स्कॅन करून जोडावा लागतो.
{ खुल्या वर्गासाठी ५२२ रुपये, तर राखीव वर्गासाठी २७२ रुपये शुल्क आहेत. महा ई-सेवाच्या केंद्रावरही ४६ रुपये जास्तीचे सेवा शुल्क भरून हे काम करता येते.
{ अर्ज दाखल केल्यानंतर ३० दिवसांत शासनाच्या गॅझेटमध्ये नवीन नाव प्रकाशित होते.
बातम्या आणखी आहेत...