आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या युती-अाघाड्या: सभापतिपदासाठी वाट्टेल ते; भाजप-सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे साटेलाेटे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अौरंगाबाद- मराठवाड्यात पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतिपदांच्या झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी समविचारी पक्षांशी युती ताेडत भाजप, शिवसेना अाणि राष्ट्रवादी काँग्रेसने परस्परांच्या कट्टर विराेधकांसाेबत युती करत सोयीचे राजकारण साधत सहकारी पक्षांना तगडा झटका देण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र दिसून अाले.असेच चित्र नाशिक, जळगाव, सोलापूर जिल्ह्यात दिसून आले.
 
अाैरंगाबाद : शिवसेना-काँग्रेस युती 
जिल्ह्यातील एकूण ९ पंचायत समित्यांपैकी भाजपने पाच जागांवर, काँग्रेसने दोन तर कन्नडच्या जागेवर आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विकास आघाडीने काँग्रेस, भाजपला सोबत घेऊन विकास आघाडीचा सभापती केला. तर पैठणला शिवसेनेचा बालेकिल्ला आमदार भुमरेंनी शाबूत ठेवला. एकूण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांत नवी राजकीय समीकरणे जुळल्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात काही अंशी या पक्षांना यश आले आहे. ही राजकीय खेळी अशीच चालू राहिल्यास सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला जिल्हा परिषदेत सत्तेपासून दूर राहावे लागणार असल्याचे चित्र सध्या तरी या सभापती, उपसभापती निवडीवरून दिसते. भाजपने ज्या पाच जागा मिळवल्या त्या ठिकाणी त्यांचे स्पष्ट बहूमत होते. सोयगाव व औरंगाबाद पंचायत समितीत काँग्रेस व शिवसेनेने एकत्र येत खुर्ची मिळवली.

जालन्यात शिवसेना-काँग्रेस एकत्र
जालना जिल्ह्यातील आठपैकी चार पंचायत समित्या ताब्यात घेण्यात भाजपला यश मिळाले आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन पंचायत समित्यांमध्ये यश मिळाले आहे. जालना पंचायत समितीत शिवसेना-भाजप युती स्पष्ट बहुमत मिळवू शकली असती. मात्र येथे शिवसेनेने काँग्रेसशी आघाडी करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले.

बीड, गेवराई : राष्ट्रवादी सेनेबरोबर
बीड जिल्ह्यात पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत राष्ट्रवादीने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील अंबाजोगाई, परळी या पंचायत समित्यांसह  आष्टी, माजलगाव, शिरूर, वडवणी व धारूर पंचायत समित्यांवर  राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. केज व पाटोदा पंचायत समित्या भाजपकडे गेल्या असून गेवराई व बीड पंचायत समितीमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससाेबत घराेबा केला अाहे.
 
लातुरात भाजपचे वर्चस्व,औशात काँग्रेस-मनसे एकत्र
लातूर जिल्ह्यातल्या दहापैकी सात पंचायत समित्यांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे तेथे भाजपचे सभापती बिनविरोध निवडून आले.  लातूर, औसा आणि जळकोटमध्ये काँग्रेसने बाजी मारली. औसा पंचायत समितीमध्ये काँग्रेसने मनसेला सोबत घेत सभापतिपद मिळवले.
 
उमरग्यात काँग्रेस -भाजप प्रथमच एकत्र
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा आणि लोहारा या  पंचायत समित्या अपेक्षेनुसार काँग्रेसने कायम राखल्या.  शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या परंड्यासह कळंब पंचायत समिती खेचून आणत राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल पाच पंचायत समित्यांवर आपला झेंडा फडकावला. उमरग्यात काँग्रेस अाणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली.
 
परभणीत भाजपचा काँग्रेसशी, तर पूर्णेत राष्ट्रवादीशी  घरोबा
परभणी जिल्ह्यातील ९ पैकी ५ पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. काँग्रेस, शिवसेना, सीताराम घनदाट मित्रमंडळ, रासप यांना प्रत्येकी एका पंचायत समितीवर समाधान मानावे लागले. परभणी भाजपने काँग्रेसला तर पूर्णेत भाजपने राष्ट्रवादीला साथ दिली. परभणी व पूर्णेत भाजपने उपसभापतिपद घेतले. 
 
धर्माबादेत भाजप-राष्ट्रवादी युती
जिल्ह्यातील १६ पंचायत समितीच्या सभापतिपदापैकी १५ ठिकाणी सभापती, उपसभापतिपदाची निवड झाली. यामध्ये सर्वाधिक आठ पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेस, चार ठिकाणी भाजप, तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष प्रत्येकी एक असे सभापतिपदाची निवड झाली. माहूर पंचायत समितीच्या सभापतिपदाची निवड झाली नाही, तेथे केवळ उपसभापितपदाची निवड झाली.भाजप व राष्ट्रवादीची युती झाली.
 
हिंगोलीत काँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना एकत्र 
हिंगाेलीत पाच पैकी चार पंचायत समितीवर काॅंग्रेस अाणि सेनेने सत्ता स्थापन केली असून, या पैकी शेनगाव व कळमनुरी येथील सत्ता काॅंग्रेसला तर हिंगाेली व अाैंढा येथील जागा शिवसेनेल देण्यात अाल्यात. वसमत येथे भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली.
 
नाशिक जिल्ह्यात सत्तेसाठी खिचडी आघाड्या
नाशिक जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकांत मालेगाव पंस मध्ये शिवसेनेच्या १५ वर्षांच्या सत्ता सामर्थ्याला भाजपने सुरूंग लावला. येथे भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. पंचायत समितीच्या १४ जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना व भाजपला प्रत्येकी सहा जागा मिळाल्या हाेत्या. भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रतिभा सूर्यवंशी सभापती तर अपक्ष अनिल तेजा उपसभापती पदी यांची निवड झाली. चांदवड येथे शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आले. सटा णा येथे भाजपने अपक्षांची साथ घेत खूर्ची मिळवली.

- नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर,देवळा पंचायत समितीत शिवसेना -राष्ट्रवादी एकत्र आले तर दिंडोरी पंसमध्ये शिवसेनेने काँग्रेसशी घरोबा केला.  निफाड मध्ये शिवसेना-अपक्ष एकत्र आले.

जळगावात वेगवेगळी समीकरणे
जळगाव जिल्ह्यातील १५ पंचायत समितीपैकी ७ पंस मध्ये भाजपचे उमेदवार सभापती झाले तर दोन पंस मध्ये शिवसेनेचे सभापती झाले. उर्वरित ठिकाणी सोयीनुसार यूती-आघाडी करत सर्वात मोठा असणाऱ्या पक्षांनी समभापतीपद मिळवले. यावल मध्ये काॅंग्रेसच्या मदतीने भाजपच्या बंडखाेराने उमेदवारी दाखल केली हाेती. समान संख्याबळ झाल्याने ईश्वरचिठ्ठीत भाजप बंडखाेर सभापती तर काॅंग्रेसचा उपसभापती झाला.चोपडा  येथे भाजप-शिवसेना युती झाली. त्यात सभापती भाजपचा तर उपसभापती शिवसेनेचा झाला. चाळीसगाव येथे राष्ट्रवादीचे सभापती, उपसभापतीपदाचे अर्ज रद्दबातल ठरले. त्यामुळे भाजपचा सभापती, उपसभापती झाला. पाचोरा सभापती भाजपचा तर उपसभापती काॅग्रेसचा झाला. भडगावात सभापती शिवसेना उपसभापती राष्ट्रवादीचा झाला. पारोळा येथे भाजप तटस्थ राहिल्याने राष्ट्रवादीचा सभापती, उपसभापती झाला. जळगाव पंसमध्ये शिवसेनेकडे बहुमत असले तरी त्यांच्याकडे अनुसूचित जातीचा उमेदवार नसल्याने भाजपचा सभापती झाला.

सोलापूर स्थानीक कल पाहून राजकारण
दक्षिण सोलापूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेमुळे भाजपला सत्ता मिळवता आली. त्याबदल्यात शिवसेनेला सभापतिपद मिळाले. माळशिरसमध्ये शिवसेनेचा एकच सदस्य असतानाही भाजपने सभापतिपदाची उमेदवारी दिली. मात्र, पराभव स्वीकारावा लागला. पंढरपुरात भाजप आघाडीतून निवडून आलेला एकमेव सदस्य त्यांच्यासोबतच राहिला. करमाळ्यात शिवसनेने स्वबळावर सभापती व उपसभापतिपद मिळवले.करमाळ्यात शिवसेना व काँग्रेसची आघाडी होती. १० पैकी सात जागा सनेने तर एक जागा काँग्रेसने जिंकली हाेती. उत्तर सोलापूरमध्ये दोन्ही पदे भारतीय जनता पक्षाने मिळवली.येथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. सोलापूर जिल्ह्यात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी तीन, शेकाप- काँग्रेस-शिवसेनेला प्रत्येकी एक,स्थानिक आघाड्याकडे दोन सभापतीपद मिळवले.
 
गडचिरोलीत काँग्रेस भाजप एकत्र 
गडचिरोली जिल्ह्यात  आरमोरी पंचायत समितीमध्ये काँग्रेस- शिवसेनेने सत्तेत वाटा मिळवण्यासाठी आपापल्या मित्रांना दूर ठेवले. तर मूलचेरा पंचायत समिती काँग्रेसने परंपरागत शत्रू भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता ताब्यात घेतली.
 
पंचायत समित्यांतील सभापती पदी कोण झाले विराजमान
> मंठा
पंचायत समिती सभापतीपदी भाजपच्या स्मिता म्हस्के तर उपसभापतीपदी भाजपचे कल्याण खरात बिनविरोध. 
> बदनापूर पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेच्या अश्विनी मदन उपसभापतीपदी श्रीराम कान्हेरे.                        
> भोकरदन पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपचे विलासराव आडगावकर , उपसभापतीपदी गजानन नागवे.                         
> अंबड पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सरला लहाने व उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे बाळू नरवडे यांची निवड. 
> यावलमध्ये काँग्रेसचा पाठिंबा आणि ईश्वरचिठ्ठीच्या साथीने भाजपच्या बंडखोर संध्या महाजन सभापती. 
> रावेर पंचायत समिती सभापतीपदी माधुरी नेमाडे व उपसभापतीपदी अनिता चौधरी. 
> संग्रामपूर पं.स.सभापतीपदी भाजपाच्या तुळसाताई वाघ तर उपसभापतीपदी उज्ज्वला घायल यांची ईश्वर चिठ्ठीने निवड. 
> बीड पंचायत समितीवर शिवसंग्राम व शिवसेनेची सत्ता स्थापन, जयदत्त क्षीरसागर यांचा मास्टर स्ट्रोक. सभापती पदी शिवसंग्रामच्या मनिषा कोकाटे तर उपसभापतीपदी शिवसेनेचे मकरंद उबाळे. 
> दिंडोरी पंचायत समिती सभापती पदासाठी शिवसेनेचे एकनाथ गायकवाड उपसभापती पदासाठी काँग्रेसचे वसंत थेटे बिनविरोध. 
> त्र्यंबक पंचायत  समिती सभापतीपदी  मा.क.प.च्या ज्योती राऊत,  उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे रवी भोये. 
> देवळा पंचायत समिती सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या केसरबाई अहिरे तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या सरला बापू जाधव बिनविरोध. 
> निफाड पं.स.सभापतीपदी शिवसेनेचे आहेर पंडित व उपसभापती पदी गुरुदेव कांदे यांची बिन विरोध निवड. 
> चांदवड पंचायत समिती सभापती पदी भारतीय जनता पार्टीचे वाहेगावसाळ गणातील उमेदवारडॉ.नितीन विठ्ठल गांगुर्डे यांची निवड. उपसभापतीपदी अमोल भालेराव. 
> मालेगाव पंचायत समिती सभापतीपदी भाजपच्या पाठींब्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिभा सूर्यवंशी. उपसभापतीपदी अपक्ष अनिल तेजा.
> मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या शुभांगी भालाणे सभापती
> जालना पंचायत समितीवर सभापतीपदी शिवसेनेचे डोंगरे तर उपसभापतीपदी काँग्रेसचे खरात यांच्या शिक्कामोर्तब. 
अंबड पंचायत समिती च्या सभापती पदी राष्ट्रवादीच्या सरला लहाने व उपसभापतीपदी राष्ट्रवादी चे बाळू नरवडे  यांची निवड. 
देऊळगाव राजा पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रजनी चित्ते यांची निवड.
नाशिक पंचायत समिती सभापती पदी राष्ट्रवादीचे रत्नाकर चुंबळे यांची तर उपसभापती कविता बेंडकुळे यांची बिनविरोध निवड
> बुलडाण्यात ईश्वरचिठ्ठीने झाला सभापतीपदाचा निर्णय. काँग्रेसच्या तस्लिमा रसुल सभापती तर भारिपच्या कविता लहासे उपसभापती. 
> यवतमाळ- शिवसेना
> पुसद- राष्ट्रवादी आणि शिवसेना
> उमरखेड- शिवसेना आणि राष्ट्रवादी
> आर्णी- कॉंग्रेस आणि भाजप
> दिग्रस- भाजप आणि कॉंग्रेस. यात सभापती कॉंग्रेसचा तर उपसभापती भाजपचा झाला आहे.
> बाभुळगाव- भाजप
> सिंदखेड राजा- भाजपच्या पाठिंब्याने राष्ट्रवादी
> चिखली- भाजपच्या पाठिंब्याने कॉंग्रेस
> मोताळा- कॉंग्रेस आणि शिवसेना
> लोणार- शिवसेना आणि राष्ट्रवादी
> खामगाव- भाजप
> जळगाव जामोद- भाजप
> चिखलदरा- कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी
> चांदूरबाजार- अपक्ष (भाजप आणि कॉंग्रेसचा पाठिंबा)
> नांदगाव- कॉंग्रेस आणि शिवसेनेची युती.
> वरुड- कॉंग्रेस
> अंजनगाव सुर्जी- भाजप
> मोर्शी- भाजप
 
 
पुढील स्लाइडवर वाचा...
>पंकजांचा मतदारसंघ राष्ट्रवादीने हिरावला, 7 पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व...
>दाेन पंचायत समित्यांमधून सेना सत्तेबाहेर...
>परभणी : ९पैकी ५ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचे सभापती...
> काँग्रेसची आघाडी: नांदेडमध्ये काँग्रेसने निम्म्या पंचायत समित्यांचे सभापतिपद राखले...
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...